मनसेने दिला ‘जय श्रीराम’चा नारा! राज ठाकरे करणार अयोध्येची वारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे अयोध्येला जाणार असून श्रीरामाचं दर्शन घेणार आहेत. राज यांचा हा दौरा झाल्यास मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय समीकरणं बदलण्याची चिन्हे आहेत. राज ठाकरेंनी दोन वर्षांपूर्वी पक्षाच्या अचानक त्यांनी हिंदुत्वाची कास धरली होती. आता नव्या भूमिकेसह मनसे मुंबई महापालिका निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याच्या तयारीत आहे.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीनं मनसेची महत्त्वाची बैठक आज वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये झाली. मनसेच्या पुढील रणनीतीवर या बैठकीत चर्चा झाली. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी बैठकीची माहिती पत्रकार परिषदेत दिली. राज ठाकरे हे १ ते ९ मार्च या कालावधीत अयोध्येचा दौरा करतील, असं नांदगावकर यांनी सांगितलं.

मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक मनसेच्या भवितव्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आहे. या निवडणुकीत चांगलं यश मिळवणं मनसेसाठी आवश्यक आहे. हिंदुत्वाची भूमिका घेतल्यामुळं मनसे भाजपशी युती करणार का, अशी एक चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहे. राज यांच्या अयोध्या दौऱ्यामुळं युतीच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. त्यामुळंच या दौऱ्याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

Leave a Comment