हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजच्या एकविसाव्या शतकात प्रत्येक व्यक्तीकडे एक ना एक तरी वाहन आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी पार्किंगची जागा असते. परंतु मोठमोठ्या शहरात सातत्याने पार्किंगचा प्रश्न उभा राहतो. मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात तर हा प्रश्न अजूनही आहेच. यावरच मात करण्यासाठी बृहन्मुंबई पालिकेने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. BMC 22,000 हून अधिक वाहनांसाठी नवीन पार्किंग व्यवस्था उभारणार आहे.
मुंबईतील वाहनांच्या वाढत्या संख्येला पार्किंगलॉट निर्माण करण्याचा निर्णय BMC ने घेतला आहे. शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे. BMC ने घेतलेल्या या निर्णयामुळे वाढत्या वाहणाला जागा निर्माण होणार आहे. तब्बल 22,000 हजाराहून अधिक वाहने सामावून घेतली जातील अश्या जागा निर्माण केल्या जाणार आहेत. त्यामुळे याचा फायदा मुंबईकरांना होणार आहे.
कोण कोणत्या ठिकाणी असतील पार्किंगस्पॉट ?
BMC च्या या निर्णयामुळे विविध भागात पार्किंगचे स्पॉट्स निर्माण केले जाणार आहेत. यामध्ये ब्रीच कँडी, मुंबई सेंट्रल, ग्रँट रोड, वाळकेश्वर, डी वॉर्डमध्ये केम्प्स कॉर्नर, मलबार हिल आणि गिरगाव येथे पार्किंगची सुविधा सुरू केली जाणार आहे. तर G/साऊथ मध्ये वरळी, प्रभादेवी आणि लोअर परळीमध्ये पार्किंगची जागा उपलब्ध करून दिली जाईल. K/वेस्ट मध्ये अंधेरीत पार्किंग स्पॉट्सची भर पडणार आहे. तसेच पूर्व उपनगरातील भांडुप आणि कांजूरमार्ग विभागात या सुविधा मिळविणारा हा चौथा प्रभाग असणार आहे. त्यामुळे ही मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी मानली जात आहे.
मुंबईत सध्या 4.5 दशलक्षांपेक्षा जास्त वाहने
मुंबईत राहणाऱ्या लोकांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. त्यामुळे त्यांच्या वाहणांची संख्याही अधिक आहे. सध्या 4.5 दशलक्षांपेक्षा जास्त झाली आहे. त्यामुळे यावर्ती उपाय करणे तेवढेच महत्वाचे आहे. मुंबईत सध्या 2.66 दशलक्ष दुचाकी, 1.44 दशलक्ष चारचाकी आणि 1.162 दशलक्ष मालवाहू वाहने असून रिक्षांची संख्या येथे एकूण 230,000 हून जास्त आहे. तर शहरात एकूण 2,060 रुग्णवाहीका आहेत. एका अहवालानुसार 2021 मध्ये वाहणांची संख्या 146,046 होती. तर 2022 मध्ये हीच संख्या 180,528 एवढी आहे.
पार्किंगचा पहिला टप्पा होणार सुरु
नागरिकांना निर्माण होणाऱ्या पार्किंग स्पॉटच्या या समस्येमुळे यावर्ती लवकरात लवकर उपाय करण्यासाठी नागरी संस्था आपल्या रस्त्यावरील पार्किंग प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू करणार आहे. ज्यामध्ये जी/दक्षिणमध्ये 86, के/पश्चिममध्ये 220, डी वॉर्डमध्ये 127 आणि एस वॉर्डमध्ये 108 पार्किंग स्पॉट्स उपलब्ध होतील. त्यामुळे याचा फायदा नगरिकांना होणार आहे. असे म्हणायला हरकत नाही.