औरंगाबाद प्रतिनिधी । औरंगाबादकडे येणारी बीएमडब्ल्यू कार विहरीत कोसळल्याची धक्कादायक घटना काल रात्री घडली. या घटनेत २ तरुण ठार तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. थर्टीफस्टचे सेलिब्रेशन करून भरधाव वेगात औरंगबादकडे येतांना असलेल्या या तरुणांच्या बी.एम.डब्लू कारच्या चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार विहरीत पडून हा अपघात घडला. सौरभ विजय नंदापुरकर वय २९ (रा रोकडे हनुमान कॉलोनी,) वीरभास कस्तुरे वय ३४(रा पुंडलिकनगर) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाची नावे आहेत तर नितीन रवींद्र शिशिकर वय-३४, प्रतीक गिरीश कापडिया वय-३०, मधुर प्रवीण जैस्वाल वय-३०अशी जखमींची नावे आहेत.
मंगळवारी या पाचही तरुणांनी दौलताबाद येथे निसर्गाच्या सानिध्यात थर्टी फस्ट साजरा करण्याचा बेत आखला होता. पाचही तरुण औषध विक्रीचे व्यवसाय करतात दिवसभराचे काम आटोपून हे तरुण मंगळवारी दौलताबाद येथील एका हॉटेलमध्ये थर्टी फस्ट साजरा करण्यासाठी गेले होते. रात्री १२ वाजता नवीन वर्षाचे सेलिब्रेशन केल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास हे पाच ही तरुण बीएमडब्ल्यू कार मधून औरंगबादच्या दिशेने येत असताना दौलताबाद किल्ल्याजवळील वळणावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट रस्त्यालगतच्या जुन्या विहरीमध्येमध्ये पडली.
यामध्ये दोन जण जागीच ठार झाले तर तीन जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अनेक तासांच्या अथक परिश्रमानंतर पहाटे विहिरी मधील कार क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आली. या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजश्री आढे करीत आहेत.