BMW Electric Scooter : BMW घेऊन येतेय Electric Scooter; दमदार लूक अन् जबरदस्त मायलेज

BMW Electric Scooter
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात (BMW Electric Scooter) पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे अनेक ग्राहकांचा कल हा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळला आहे. त्यामुळे बाजारातही अनेक इलेक्ट्रिक गाड्या लॉंच होत आहेत. त्याचपार्श्वभूमीवर BMW भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार आहे. BMW CE 04 असे या इलेक्ट्रिक स्कूटरचे नाव आहे. जागतिक बाजारात कंपनीने आधीच ही इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे.

फीचर्स – BMW Electric Scooter

नवीन BMW CE04 इलेक्ट्रिक स्कूटर ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीमसह येते. यामध्ये इको, रोड आणि रेन असे तीन राइडिंग मोड आहेत . (BMW Electric Scooter) याशिवाय डायनॅमिक ट्रॅक्शन कंट्रोल आणि डायनॅमिक राइड मोड पर्यायी रूपात ऑफर केले जातात. BMW च्या या ई-स्कूटरमध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी,इंटीग्रेटेड मैप्स आणि राइड मोड रीडआउटसह 10.25-इंचाचा HD TFT डिस्प्ले आहे.

BMW Electric Scooter

120 kmph टॉप स्पीड-

BMW च्या या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये (BMW Electric Scooter) बॅटरी आणि मागील चाकाच्या मध्ये पर्मनंट मोटर आहे. ही इलेक्ट्रिक मोटर 4,900 rpm वर 41.4 bhp आणि 1,500 rpm वर 61 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड 120 kmph असून 2.6 सेकंदात 0 ते 50 किमी प्रतितास वेग वाढवू शकते.

BMW Electric Scooter

130 किमी मायलेज-

गाडीला 8.9kWh ची लिथियम-आयन (BMW Electric Scooter) बॅटरी आहे. 2.3kWh च्या चार्जरवर फुल्ल चार्ज होण्यासाठी 4 तास 20 मिनिटे वेळ लागतो तर 6.9kWh फास्ट चार्जरसह फुल्ल बॅटरी फुल्ल चार्जिंग होण्यासाठी एक तास 40 मिनिटे लागतात. BMW चा दावा आहे की एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक स्कुटर 130 किमी धावू शकते.

हे पण वाचा :

TVS Apache RTR 160 4V चे स्पेशल एडिशन लॉंच; पहा फीचर्स आणि किंमत

Electric Bike : 307 किमी मायलेज देणारी Electric Bike लॉन्च; पहा किंमत

Ola Electric Bike : E- Scooter नंतर OLA आणणार इलेक्ट्रिक Bike; कधी होणार लॉन्च?

Bajaj Pulsar N160 : बजाजची Pulsar N160 नुकतीच लॉंच; पहा किंमत आणि फीचर्स