सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
पाटण तालुक्यात एका बॉबी विक्रेत्याचा निर्घृण खून झाल्याची माहिती समोर येत आहे. रमण तेवर उर्फ अण्णा असं सदर मृत व्यक्तीचे नाव असून तो पाटण शहराजवळ संत निरंकारी भवन शेजारी असणाऱ्या इमारतीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून तो भाड्याने राहत होता. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
रमण तेवर उर्फ अण्णा हे मूळचे तामिळनाडूचे असून गेल्या अनेक वर्षांपासून ते पाटणसह परिसरात बॉबी विक्रीचा धंदा करत आहेत. तो राहत असलेल्या इमारतीच्या मागील बाजूच्या शेडामध्ये खून झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्याच्या डोक्यामध्ये लोखंडी रॉडने हल्ला करून त्याचा अंगावरती बॉबीची पोते ठेवण्यात आले होते. अशी माहिती घटनास्थळावरून समजली आहे.
रमण तेवर हे मूळचे तामिळनाडू येथील असून त्याची पत्नी दोन दिवसांपूर्वी आपल्या मूळ गावी गेली होती. त्यांना दोन मुलं व दोन विवाहित मुली आहेत . दरम्यान, या दुर्दैवी घटनेनंतर पाटण पोलिस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलीस अधिक तपास करत आहेत. हा खून नेमका कसा झाला याबाबत अद्याप स्पष्टता समोर आलेली नाही.