मुंढव्यात बोगस मतदानाचा धक्कादायक प्रकार उघडकीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी । आज संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. अनेक ठिकाणी शांतपणे आणि शिस्तीत मतदान सुरू असताना काही ठिकाणी मात्र मतदानाला हिंसक स्वरूप आणि बोगसपणाचं गालबोट लागल्याचं निदर्शनास आलं आहे. करमाळा येथे दोन अपक्ष उमेदवारांच्या गटामध्ये धुमश्चक्री झाल्यानंतर पुण्यातील मुंढवा परिसरात बोगस मतदानाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मतदान स्लिपवर नाव आणि नंबर असतानाही, कुठल्याच ओळ्खपत्राची तपासणी न करता दुसरी महिला मतदान करून गेल्यामुळे मतदानाचा हक्क न बजावता येणाऱ्या महिलेने आपली खंत माध्यमांसमोर व्यक्त केली आहे.

मुंढवा येथील शाहू महाविद्यालयात सदर प्रकार घडला आहे. शाहीन शब्बीर सय्यद असं मतदान करायला न मिळालेल्या महिलेचं नाव आहे. बोगस मतदानाचा हा प्रकार उघडकीस आल्यावर नागरिकांकडून मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावत याविषयी जाब विचारला. हा प्रकार नक्की घडलाच कसा, अधिकाऱ्यांनी असा हलगर्जीपणा का केला याची चौकशी करण्याचे आश्वासन मतदान केंद्रप्रमुखांनी केलं आहे.

Untitled design (7)
बोगस मतदानामुळे मतदान करू न शकलेल्या शाहीन शब्बीर सय्यद

Leave a Comment