हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. सरकारनं केलेल्या आवाहनाला जनतेनं प्रतिसाद दिला आहे. मात्र, अजूनही मोठ्या प्रतिसादाची अपेक्षा आहे. कारण सध्या तरी संपर्क आणि संसर्ग टाळण्याशिवाय काहीही पर्याय नाही, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. आपण एका विषाणू सोबत जागतिक युद्ध लढत आहोत तेव्हा एकजुटीनं लढण्याची गरज आहे. राज्यातील जनतेने अनावश्यक प्रवास टाळावा, सरकारी यंत्रणेवरील ताण वाढवू नका, सरकारने दिलेल्या सूचना पाळा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केलं होत. या आवाहनाला साद देत बॉलीवूडमधील कलाकार सुद्धा पुढे आले आहेत.
करोना विरुद्धच्या लढाईत आम्ही काही करू शकतो का? असं दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी मला विचारणा केली होते. त्यानुसार दुसऱ्याच दिवशी बॉलीवूडमधील प्रसिद्ध कलाकारांनी कोरोना विषयी जनजागृती करणारा संदेश देणार एक व्हिडिओ त्यांनी मला पाठवला. रोहित शेट्टींनी बनवलेला हा व्हिडिओ महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर पोस्ट केल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. हा विडिओ राज्यातील जनतेने नक्की पाहावा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी आपल्या संवादात सांगितलं.
दरम्यान या व्हिडिओत अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, रणवीर सिंग, आलिया भट, माधुरी दीक्षित, अजय देवगण, आयुष्यमान खुराणा, अर्जुन कपूर असेच बरेच बॉलीवूड कलाकार तुम्हाला करोनापासून बचाव करण्यासाठी संदेश संतांना दिसतील. तर पाहुयात हा व्हिडीओ..
Let us all come together & win this #WarAgainstVirus
Thank you @RSPicturez & all the artists for this pic.twitter.com/oqBKZm7TcZ
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 20, 2020
दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.