हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असून रुग्णसंख्या काही केल्या आटोक्यात येईना. एकीकडे कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असताना दुसरीकडे बेड, व्हेंटिलेटर, आणि ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. करोनाच्या या भयंकर महामारीने जनजीवन विस्कळीत झालंय. अशातच बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी प्रथमच मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. खर अनुपम खेर हे मोदी सरकारचे समर्थक असल्याचे सर्वांनाच माहिती आहे. पण आता त्यांनी सुद्धा सरकारवर टीका केली आहे.
कोव्हिडमुळे देशात सध्या जी स्थिती निर्माण झालीय त्यासाठी मोदी सरकारला जबाबदार धरणं गरजेचं आहे. सध्याच्या स्थितीत प्रतिमा बनवणं नाही तर जीव वाचवणं जास्त गरजेच आहे हे सरकारला लक्षात घ्यायला हवं.सरकारच्या आरोग्य सेवा व्यवस्थापनात चूक झाली आहे. मात्र इतर राजकीय पक्षांनी स्वत:च्या फायद्यासाठी या चुकांचा फायदा घेऊ नये.” असं म्हणत अनुपन खेर यांनी सरकारला दोष दाखवून दिले आहेत.
सरकारला ज्या कामासाठी निवडून देण्यात आलेले आहे ते काम सरकारने करायला हवे. देशात मृतदेह नदीमध्ये तरंगत असल्याचं दिसतंय. एखादी मानवी मन नसलेली व्यक्तीच ही घटना पाहून दु:खी होणार नाही. सध्या सरकारने प्रतिमा संवर्धन करण्यापेक्षा दुसरंही काही महत्त्वाचं आहे, हे समजून घेण्याची गरज आहे,” असे अनुपम खेर म्हणाले
दरम्यान, अनुपम खेर हे मोदींचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. यापूर्वी अनेकदा ते पंतप्रधानांची पाठराखण करताना दिसले आहेत. पंतप्रधान मोदी आणि अनुपम खेर यांचे घनिष्ठ संबंध आहेत. जुलै 2019 मध्ये पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर अनुपम खेर यांनी लिहिले होते, की पंतप्रधान मोदी हे आपल्यासाठी ऊर्जेचा स्रोत आहेत.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.