Wednesday, February 8, 2023

सलमान करतोय ‘राधे’च्या सिक्वलची तयारी; चाहत्यांसाठी आखली अटींची चौकट

- Advertisement -

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सलमान खानचा ‘राधे’ हा चित्रपट अलिकडेच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. या चित्रपटातील अॅक्शन सीन्स पाहून सलमानच्या चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. मात्र दुसरीकडे टीकाकारांनी मात्र त्याला सळो कि पळो करून सोडले होते. शिवाय ऑनलाईन प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाला अनेक संकटांचा सामना करावा लागला. सलमानच्या इतर चित्रपटांच्या तुलनेत राधेला आर्थिक यश कमी मिळाले. मात्र तरीही आता सलमान राधेचा सिक्वल घेऊन येण्याची तयारी करतोय. मात्र यासाठी त्याने प्रेक्षकांसमोर अटी ठेवल्या आहेत.

- Advertisement -

राधे चित्रपटासाठी बॉलिवूड लाईफला दिलेल्या मुलाखतीत सलमानने ही मोठी घोषणा केली आहे. या चित्रपटाचा सिक्वेल यावा अशी सलमानच्या चाहत्यांची इच्छा आहे. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राधेच्या पुढील भागासाठी प्रतीक्षा करत असल्याचे म्हटले होते.

कदाचित याचमुळे सलमानने राधेच्या सिक्वलबाबत विचार केला असावा. या मुलाखतीत बोलताना सलमान म्हणाला कि, प्रेक्षकांच्या आग्रहाखातर माझी टीम राधे चित्रपटाच्या सिक्वलचा विचार करत आहे. जर राधेला असाच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत राहिला तर आम्ही त्याचा सिक्वल घेऊन नक्कीच येऊ.

https://twitter.com/AAAOOOLOLITA/status/1393232167161851904

पुढे म्हणाला, “राधे हा वॉण्टेडचा सिक्वल नाही. वॉण्टेडमधील व्यक्तिरेखा घेऊन त्याच्यावर एक वेगळाच चित्रपट आम्ही तयार केला आहे. पण दोन्ही चित्रपटातील स्टाईल किंवा अॅक्शन सीन बरेच एक सारखे वाटत असल्याने प्रेक्षकांना हा गैरसमज झाला आहे. आम्ही सध्या या चित्रपटाच्या सिक्वेलचा विचार करत आहोत. ज्या प्रमाणे चुलबुल पांडे ही व्यक्तिरेखा दबंग चित्रपटाच्या सीरिजमधून विस्तारली गेली.

त्या प्रमाणे राधेला देखील आणखी विस्तारता येऊ शकेल का? याबद्दल आमची क्रिएटिव्ह टीम विचार करत आहे.” यासोबतच सलमानने सांगितले कि जर प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद देत राधेला ओळख करून दिली आणि पायरसीचा अवलंब केला नाही, तरच हा सिक्वल काढला जाणार आहे. अर्थात यावेळी भाईजानने चाहत्यांसाठी अटींची चौकटच बांधली आहे, असे म्हणायला काही हरकत नाही. आता हे पाहणे उत्सुकतेचे आहे कि सलमान खरोखरच राधेचा सिक्वल घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार कि प्रेक्षकांना इच्छेला धुडकावणार.