रिअल सुपरहिरो सोनू सूद कोरोना पॉझिटिव्ह

नवी दिल्ली : कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये अडकलेल्या कितीतरी लोकांना आपल्या गावी जाण्यासाठी पूर्णपणे मदत करणाऱ्या रिअल लाईफ सुपर हिरो सोनू सूदला कोरोनाने गाठालं आहे. अभिनेता सोनू सूदची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. याबाबतची माहिती स्वतः सोनू सूदने आपल्या अधिकृत अकाऊंटवरून ट्विट करत दिली आहे.

त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,’नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला सूचित करू इच्छितो की माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. म्हणून मी स्वतःला विलगीकरणात ठेवलं आहे. काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. उलट आता माझ्याकडे पहिल्यापेक्षा अधिक वेळ आहे. तुमच्या अडचणींना दूर करायचे आहे. लक्षात ठेवा कोणत्याही कठीण प्रसंगात मी तुमच्या नेहमी सोबत आहे ‘ अशा आशियाचे ट्विट सोनू सूद याने केले आहे.

दरम्यान आपण स्वतः कोरोना पॉझिटिव असून देखील अशा अवस्थेत सुद्धा त्याने इतरांना मदत करण्यासाठी दाखवलेल्या ‘ह्यूमन स्पिरिट’ बाबत त्याचे सोशल नेटवर्किंग साइट्सवर कौतुक केलं जात आहे. सोनू सुदच्या ट्वीटला अर्ध्या तासात 10हजार लाईक मिळाले आहेत. तर दीड हजार जणांनी हे ट्विट रिट्विट केले आहे. तर लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्या ट्विट वर अनेक जणांनी त्याच्याकडे मदत देखील मागितली आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

You might also like