हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हतबल होऊ लागला आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येसमोर वैद्यकीय सुविधांची कमतरता जाणवते आहे. रुग्णालयातील बेड्स, औषधे तर ऑक्सिजनअभावी लोक हतबल झालेली दिसत आहेत. यामुळे अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. राजकारणी आणि त्यांचे घाणेरडे राजकारणच या रुग्णांच्या मृत्यूचे कारण आहे असा संताप व्यक्त केला जात आहे. बॉलिवूडचा अण्णा अर्थातच अभिनेता सुनील शेट्टीनेही या संदर्भात राजकारण्यांना चांगलेच सुनावले आहे. दरम्यान हि राजकीय कुरघोडी करण्याची वेळ नाही असे ठणकावून म्हटले आहे.
https://www.instagram.com/p/COMzqTlhRY7/?utm_source=ig_web_copy_link
संपूर्ण राज्यात रोज होणारे हजारो मृत्यू, ऑक्सिजन आणि बेड्ससाठी रुग्णांच्या नातेवाईकांची होणारी वणवण आणि तरीही आपल्या प्रियजनांना गमावल्याचे दुःख असे भीषण चित्र पाहून अण्णा भडकला आणि त्याने राजकारण्यांवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. एका ताज्या मुलाखतीत सुनील शेट्टीने या परिस्थितीसाठी राजकारण्यांना जबाबदार ठरवले आहे. राजकारण्यांनी त्यांचे काम चोख बजावले असते, तर आज लोकांवर ही वेळ आली नसती.
https://www.instagram.com/p/CM6N3PbBIvf/?utm_source=ig_web_copy_link
पुढे, त्यांना उपचारासाठी वणवण भटकावे लागले नसते. खुर्चीवर बसणारे राजकारणी पुढच्या पाच वर्षात माया कशी जमावायची याचा विचार करता. देशासाठी काय करायचे, याचा विचारही त्यांच्या डोक्यात येत नाही. यांना आपणच निवडून दिले आणि आज यांच्याच मुळे आपल्यावर बेड्स, ऑक्सिजनसाठी भटकण्याची वेळ आलीये. यांच्यामुळेच ही स्थिती उद्भवलीये. पण काळ बदलतो तसेच सत्तेच्या सिंहासनावर बसलेले हे लोकही बदलतील, असे अण्णा म्हणाला.
https://www.instagram.com/p/CMkPDloB8do/?utm_source=ig_web_copy_link
राजकारणात अद्यापही काही चांगले कार्यकर्ते आहेत, नेते आहेत. अशा चांगल्या लोकांना निवडून द्या. तुमच्यासाठी कष्ट घेणा-यांना सत्तेत आणा, असे आवाहन त्याने लोकांना केले आहे. देशात भयंकर स्थिती आहे़ आपण सर्वच कठीण परिस्थितीतून जात आहोत. ही वेळ एकमेकांना मदत करण्याची आहे. एकमेकांवर आरोप करण्याची, राजकीय कुरघोडी करण्याची हि वेळ नाही.., असेही सुनील शेट्टी म्हणाला. सध्या सुनील अण्णा कोरोना रूग्णांच्या मदतीसाठी सोशल मीडियावर एक मोहिम राबवित आहे. या मोहिमेच्या अंतर्गत तो लोकांना ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर उपलब्ध करुन देत आहे.