ऑन कॅमेरा कसे रडतात ते शिकून घ्या.. !; अभिनेता वीर दासने लगावला मोदींना टोला, तर भक्त झाले नाराज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता वीर दास हा बॉलिवूड क्षेत्रातील एक कॉमिक अभिनेता आहे. आपल्या अनोख्या अंदाजाने आणि कॉमिक टायमिंगने त्याने स्वतःचा असा चाहता वर्ग निर्माण केला आहे. सध्या राज्यातील सर्व चित्रीकरण बंद असल्यामुळे वीर सोशल मीडियावर चांगलाच ऍक्टिव्ह झाला आहे. तो देशातील सद्यस्थितीवर त्याच्या कॉमिक अंदाजात नेहमीच काही ना काही भाष्य करीत असतो. नुकतेच पंतप्रधान मोदी कोरोनाच्या काळात गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीला श्रद्धांजली देताना भावुक झाले होते. याच आशयावर वीरने एक असे ट्विट केले आहे. ज्यात त्याने अप्रत्यक्षपणे मोदींना कसे रडतात ते शिकून घ्या म्हणत जबरदस्त टोला लगावला आहे. यानंतर बऱ्याच मोदी भक्तांना अर्थात मोदींच्या फॅन्सना राग आला आणि त्यांनी या ट्विटवर नाराजी व्यक्त केली आहे.

 

अभिनेता वीर दासने हे ट्विट त्याच्या हटके आणि कॉमेडी अंदाजात केले आहे. हे ट्विट करताना त्याने लिहिले कि, “पुढच्या वेळेस तुम्ही बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत जेव्हा सेल्फी काढाल, तेव्हा त्यांच्याकडून ऑन कॅमेरा कसं रडतात हे शिकून घ्या..” तसे पाहिलात तर या ट्विटमध्ये वीरने कुणाचेही नाव घेतलेले नाही. मात्र अप्रत्यक्षपणे त्याने बरोबर ठिकाणी निशाणा लावला आहे. ह्या ट्विटनंतर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यातील अनेक प्रतिक्रिया या वीरने केलेल्या ट्विटकरीता समर्थन दर्शविणाऱ्या आहेत. तर काही मोदींच्या भक्तांच्या भावना अत्यंत दुखावलेल्या दिसत आहेत. यातील अनेकांनी वीरच्या ट्विटवर त्याला प्रत्युत्तर देणारे ट्विट्स केले आहेत.

वीरच्या या ट्विटनंतर अनेक युजर्सने विविध भूमिका बजाविल्या आहेत. कुणी समर्थन करताना दिसत आहे तर कुणी कट्टर विरोधक असल्याचे भासत आहे. वीरच्या या ट्विटने नाराज झालेल्या एका युजरने लिहिले आहे कि, पुढच्यावेळी जेव्हा तू मोदींना भाषण देण्याचे ठरवशील, तेव्हा लक्षात राहूदे कि त्यांना मत मिळाली आहेत. ते कार्यक्रम विकत नाहीत. या ट्विटनंतर पुन्हा एकदा वीरने या ट्विट कर्त्याला उत्तर दिले आहे. या ट्विटमध्ये वीर म्हणाला, मी सहमत आहे. ते त्यांच्या उपस्थितीसाठी लोकांना पैसे देतात. या ट्विटनंतर वीरचे चाहते अक्षरशः त्याचे कौतुक करताना दिसत आहेत.

अभिनेता वीर दासीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, वीरने त्याचे करिअर झूम टीव्हीवरील दोन शोच्या होस्ट स्वरूपात सुरु केले होते. इस रूट कि सभी लाईन व्यस्त है पासून अभिनय क्षेत्रात उतरलेला वीर पुढे एक राही- वीर दास या स्टॅन्ड अप कॉमेडी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचला. त्यानंतर तो अनेक कॉमेडी शोज मध्ये दिसला होता. केवळ रिऍलिटी शो नव्हे तर वीरने बॉलिवूडच्या अनेक चित्रपटात सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. नमस्ते लंडन, लव्ह आज कल, बदमाश कंपनी, दिल्ली बेल्ली, गो गोवा गॉन, मस्तीजादे या आणि अश्या अनेक चित्रपटांत तो विविध भूमिकांतून झळकला होता.

Leave a Comment