मिलिंद सोमणची आई वयाच्या ८१ व्या वर्षीही आहे तंदुरुस्त,आपल्या सूनेसह लंगडी खेळतानाचा व्हिडीओ झाला व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मॉडेल-अभिनेता मिलिंद सोमण आपल्या फिटनेसची विशेष काळजी घेतो. तो या लॉकडाऊनमध्येही व्यायाम करत आहे. मिलिंदने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये त्याची ८१ वर्षीय आई आणि २८ वर्षीय पत्नी अंकिता कुंवर गच्चीवर लंगडी खेळत एका पायावर धावत आहेत.

मिलिंदने व्हिडिओ शेअर करताना लिहिले – २८ आणि ८१.एखाद्याने सर्व वयोगटात तंदुरुस्त राहणे आवश्यक आहे. व्हिडिओमध्ये मिलिंदची आई उषा आणि पत्नी अंकिता छताच्या एका कोपऱ्यातून दुसर्‍या कोपऱ्यात लंगड्या पायाने धावत असताना दिसत आहेत.

मिलिंद सोमणप्रमाणेच त्याची आईही व्यायाम करते. मिलिंदने त्यांचे व्हिडिओ अनेक वेळा शेअर केले आहे ज्यामध्ये त्यांनी आपल्या मुलासह मॅरेथॉनमध्येही भाग घेतला आहे.


View this post on Instagram

 

Went out to the market for the first time yesterday. No cars. People in masks. Very very quiet. Feel fortunate to get a few fresh vegetables that were available just a few hundred meters from home. In the situation we are in today, so many people have so much less. When I read about whole families walking back 100’s of kilometers from cities to their villages, with little or no food and water, I know that I have a lot to be grateful for. Things in the market were well organized, the few people on the street were maintaining distance from each other outside shops and in front of the few vegetable and fruit vendors. I have never seen such orderly queues, or the kind of civic mindedness that I see today. It seems like the beginning of a big change, perhaps we will see a new social order in the years to come, different in ways that we cannot imagine. #betterhabits4betterlife #stayhealthy #stayhappy #keepmoving #neverstop #love

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning) on Apr 1, 2020 at 12:48am PDT

 

कोरोना विषाणूमुळे २१ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली गेली. यावेळी प्रत्येकाला घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मिलिंद त्याची आई आणि अंकिताबरोबर दर्जेदार वेळ घालवत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

 

Leave a Comment