हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना तातडीने रविवारी सकाळी मुंबईच्या हिंदुजा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान दिलीप कुमार यांना’बिलाट्रल प्ल्युरल इफ्यूजन'(bilateral pleural effusion)चे निदान झाले. यामुळे त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले असून ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तथापि त्यांची प्रकृती स्थिर आहे. डॉ. नितीन गोखले आणि डॉ. जलील पारकर यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर सध्या योग्य ते उपचार सुरू आहेत. एएनआयने याबाबतचे वृत्त दिले आहे. डॉ. जलील पारकर यांनी ई-टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार, सर्व काही ठीक राहिले तर दिलीप कुमार यांना येत्या २ ते ३ दिवसांत रूग्णालयातून डिस्चार्ज मिळेल.
#UPDATE | Veteran actor Dilip Kumar has been diagnosed with bilateral pleural effusion and kept on oxygen support in ICU ward. His condition is stable: Dr Jalil Parkar, the pulmonologist treating the actor at Mumbai's PD Hinduja Hospital pic.twitter.com/CNWWfOYxiZ
— ANI (@ANI) June 6, 2021
(bilateral pleural effusion)प्ल्युरल इफ्यूजन म्हणजे छातीत फुफ्फुसांच्या चारही बाजूंनी पाणी जमा होणे. याला वैद्यकीय भाषेत प्ल्युरल इफ्यूजन म्हटले जाते. छातीत पाणी जमा झाल्याने फुफ्फुसांवर ताण येऊन रूग्णाला श्वास घेण्यास त्रास जाणवतो, हेच दिलीप कुमार यांच्या बाबतीत झाले. काल सायरा बानो यांनी पती दिलीप कुमार यांच्या प्रकृतीबद्दल त्यांच्या चाहत्यांना माहिती दिली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. हे रुग्णालय नॉन कोविड आहे आणि त्यांना कोरोना झालेला नाही.
https://twitter.com/TheDilipKumar/status/1401417347592691715
आम्ही लवकरच घरी परत जाऊ. डॉ. नितीन गोखले आणि त्यांची संपूर्ण टीम दिलीप साहब यांची काळजी घेत आहेत. कृपया त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आम्ही दोघांनीही कोरोना लस घेतली आहे, असे त्यांनी सांगितले होते. तसेच या दरम्यान दिलीप कुमार यांच्या निधनाच्या अफवांना जोर आला होता. या बातम्यांचा वेग वाढण्याआधीच सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून या वृत्ताचे खंडन करीत चाहत्यांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले होते.
https://twitter.com/TheDilipKumar/status/1401533990905868289
९८ वर्षीय दिलीप कुमार यांना गेल्या महिन्यातही याच रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा केवळ रूटिन चेकअपसाठी दिलीप कुमार यांना भरती करण्यात आल्याचे सायरा बानो यांनी स्पष्ट केले होते. कोरोना संक्रमणामुळे गतवर्षी दिलीप कुमार यांच्या दोन लहान भावांचे निधन झाले. २१ ऑगस्ट २०२० रोजी त्यांचा लहान भाऊ असलम यांचे निधन झाले होते. दरम्यान ते ८८ वर्षांचे होते. यानंतर 2 सप्टेंबर २०२० रोजी आणखी एक भाऊ अहसान यांनी जगाचा निरोप घेतला होता आणि ते ९० वर्षांचे होते.