कितना गिरोगे सा**…! म्हणत, सोनू निगमने दिल्या ट्रोलर्सला शिव्या आणि पुन्हा झाला ट्रोल

Sonu Nigam
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड जगतातील सुप्रसिद्ध गायक सोनू निगम सध्या सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. दरम्यान या ना त्या कारणाने तो सारखाच चर्चेत असतोच. काहीच दिवसांपूर्वी सोनू निगम रक्तदान करताना दिसला होता. रक्तदान करतानाचा फोटो त्याने स्वतःच शेअर केला होता. मात्र सामाजिक बांधिलकी जपण्याचा हा प्रयत्न त्याच्यावर चांगलाच उलटला होता. कौतुकाऐवजी हा फोटो पाहून लोकांनी त्याला प्रचंड ट्रोल केले. रक्तदान करतेवेळी सोनूने तोंडावर मास्क लावला नव्हता, म्हणून नेटक-यांनी त्याला सुनावले होते. या ट्रोलिंगमुळे सोनूचा संताप प्रचंड वाढला आणि यानंतर त्याने थेट ट्रोलर्सला नको त्या शब्दात हासडले आहे. परिणामी ट्रोलर्सने त्याला यावरून आणखीच ट्रोल केले.

रक्तदान करतेवेळी तोंडावर मास्क न लावल्यामुळे सोनू निगमला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले होते. यावर ट्रोल करणाऱ्यांना फैलावर घेत सोनुने कमेंट बॉक्स मध्ये लिहिले कि, ‘इथे (सोशल मीडियावर) आइंस्टाइन बनून फिरणा-यांनो, मला तुमच्याच भाषेत उत्तर देऊ द्या. कारण तुम्ही त्याच लायकीचे आहात. साले गधों, उल्लू के पट्ठों… रक्तदान करताना मास्क लावण्यावी परवानगी नसते. आणखी किती खालच्या दर्जाला जाणार आहात साले लेफ्टिस्ट?’. यानंतर मात्र ट्रोलर्सने विडा उचलल्याप्रमाणे सोनूला पुन्हा ट्रोल केले आहे.

 

अनेकांनी सोनूच्या या कमेंटवर रिप्लाय करीत त्याच्यासाठी अपशब्दांचा वापर केला आहे. तर एका युजरने पुराव्यानिशी सोनूला म्हटले आहे कि, सरजी तुमच ब्लड डोनेशन कॅम्प बहुदा समांतर ब्रह्मांडात चालतंय जिथे रक्त दान करताना मास्क लावण्याची परवानगी दिली जात नाही.या कमेंटमध्ये युजरने पुरावा म्हणून रक्तदानासाठी लागू केलेलया नियमावलीचा फोटो पोस्ट केला आहे.

तर अन्य एका युजरने सोनू निगम तुझ्यासारखा बेशरम कुणी नाही, तुझी जीभ तुझे व्यक्तिमत्व दर्शविते असे म्हटले आहे. गायक सोनू निगम मुंबईतील जुहू येथे आदर्श फाऊंडेशन तर्फे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यासाठी उपस्थित राहिला होता. या रक्तदान शिबिराचे उदघाटन केल्यानंतर त्याने स्वतः पुढाकार घेत रक्तदान केले. याचा व्हिडिओ व फोटो त्याने स्वतः सोशल मीडियावर शेअर केले होते.

https://www.facebook.com/BollywoodSociety/videos/291153139151151

हाच व्हिडिओ पाहून अनेकांनी त्याला जिल्लत के लड्डू खिलवले. कारण सुरवातीला या व्हिडीओमध्ये गायक सोनू निगम चेहऱ्यावर मास्क लावून उद्घाटन करताना दिसून येतोय, लोकांशी गप्पा मारतानाही त्याच्या चेहऱ्यावर मास्क दिसतोय, मात्र जेव्हा तो रक्तदान करतो त्यावेळी त्याने चेहऱ्यावर मास्क लावलेला नाही.