हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रेल्वेकडून प्रवाश्यांसाठी अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. अशातच सध्याच्या सणासुदीच्या काळात जर आपण प्रवास करण्याची योजना आखत असाल तर IRCTC द्वारे तिकीट बुक करता येईल. हे लक्षात घ्या कि, IRCTC च्या वेबसाईटवर खाते तयार करून आपल्याला तिकीट बुक करता येते. खाते नसल्यामुळे अनेक लोकांना इतरांकडून तिकीट बुक करावी लागतात. अशा परिस्थितीत त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. तर आज आपण घरबसल्या IRCTC च्या वेबसाईटद्वारे तिकीट कसे बुक करावे हे जाणून घेउयात…
हे लक्षात घ्या कि, IRCTC वेबसाइटला भेट देऊन, आपला मोबाइल नंबर, ईमेल आयडी, IRCTC आयडी आणि पासवर्ड टाकून आपले नवीन खाते तयार करता येईल.
अशा प्रकारे तयार करा नवीन खाते
1. IRCTC वेबसाइट http://www.irctc.co.in वर जा.
2. वरील टॅबमधून रजिस्ट्रेशनच्या पर्यायावर क्लिक करा.
3. आता तुमच्या समोर एक फॉर्म उघडेल, त्यात User Name, Password, Security Question, Security Answer टाका आणि भाषा निवडा.
4. पर्सनल डिटेल्स खाली देणे आवश्यक आहे. जसे पूर्ण नाव, लिंग, जन्मतारीख, व्यवसाय, ई-मेल आयडी, मोबाईल नंबर भरावा लागेल.
5. या खाली रजिस्टर्ड ऍड्रेस टाकावा लागेल.
6. सर्व माहिती भरल्यानंतर खालील नियम आणि अटींवर क्लिक करा.
7. रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP येईल. OTP टाकून सबमिट केल्यानंतर आपले खाते तयार होईल.
अशा प्रकारे तिकीट बुक करा
आपले खाते तयार झाल्यानंतर http://www.irctc.co.in वर आपला युझर नेम आणि पासवर्डद्वारे लॉग इन करा. यानंतर आपल्या अकाउंट डॅशबोर्डवर तिकीट बुक करण्याचा पर्याय दिसेल. यानंतर सहजपणे तिकीट बुक करू शकाल. या आयडीद्वारे, आपल्याला स्वतःसाठी आणि कुटुंबातील सदस्यांसाठी किंवा मित्रांसाठी सहजपणे तिकिटे बुक करता येतील. आयडी तयार केल्यानंतर तिकीट बुक करणे खूप सोपे होईल.
अशा प्रकारे मिळवा कन्फर्म तिकीट
रेल्वेकडून प्रवाशांना कन्फर्म तिकिटांसाठी काही खास सुविधा दिली जाते. ज्याद्वारे अवघ्या काही मिनिटांतच कन्फर्म तत्काळ तिकिटे मिळू शकेल. यासाठी IRCTC App वर मास्टर लिस्ट फीचरद्वारे प्रवाशांची नावे आधीच लिहावी लागतील. यानंतर, तिकीट बुक करताना पुन्हा तपशील देण्याची गरज भासणार नाही. यामुळे वेळेची बचत होईल आणि बुकिंग करताना कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढेल.
हे पण वाचा :
DBS Bank च्या FD वरील व्याजदरात वाढ, नवीन दर पहा
गेल्या 2 वर्षांत ‘या’ Penny Stock ने गुंतवणूकदारांना मिळवून दिले लाखो रुपये
Post Office च्या ‘या’ योजनेमध्ये पैसे गुंतवून मिळवा अनेक फायदे !!!
IDBI Bank ने लाँच केली स्पेशल FD, नवीन व्याज दर तपासा
IQOO Neo 7 5G स्मार्टफोन ट्रिपल कॅमेरा सेटअपसह लॉन्च, किंमत अन् फीचर्स जाणून घ्या