कराड तालुक्यातील दोघे सातारा जिल्ह्यातून हद्दपार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील अमित हनुमंत कदम (सध्या रा. होली फॅमिलीच्या पाठीमागे, वैभव कॉलनी विद्यानगर- कराड, मूळ रा. अंतवडी, ता. कराड) व शेखर ऊर्फ बाळू प्रकाश सूर्यवंशी (रा. हजारमाची- अोगलेवाडी, ता. कराड) यांना प्राधिकरण तथा उप विभागीय दंडाधिकारी कराड यांनी दोघांना एक वर्षाकरता सातारा जिल्ह्यातून हद्दपार केलेले आहे.

सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारी कारवाया मोडीत काढण्यासाठी व कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्याकरता व गुन्हेगारी कृत्यांना प्रतिबंध करण्याकरता पोलीस अधीक्षक अजय कुमार बंन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी हद्दपार प्राधिकरण यांना प्रस्ताव सादर केलेला होता. या प्रस्तावावर सुनावणी होऊन दोन्ही गुन्हेगारांना एक वर्षाकरता सातारा जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.

कराड शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्याकरता गुन्हेगारी टोळ्यांच्या हालचालीवर विशेष पथक व गोपनीय यंत्रणेकडून लक्ष केंद्रित करून कारवाई सत्र सुरू आहे. कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, पोलीस हवलदार नितीन येळवे, पोलीस नाईक संजय जाधव, प्रफुल्ल गाडे, विनोद माने यांनी ही कामगिरी केली.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like