भिडेंच्या विचाराच्या पक्षातील अनेक नेते, मंत्र्यांना कोरोना झालाय : संजय राऊतांचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांनाही संजय राऊतांनी खोचक टोला लगावला आहे. “कोणत्या शहाण्याने हा मास्क लावण्याचा सिद्धांत काढला आहे. काही गरज नाही मास्क लावण्याची, हा सगळा मूर्खपणा आहे”, असं संभाजी भिडे म्हणाले. हा मूर्खपणा सुरु आहे. कोरोना हा रोगच नाहीय. हा गां* वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे, असं वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी संभाजी भिडेंना टोला लगावलाय. संभाजी भिडे हे विद्वान आहे. ते ज्या विचारांचे आहेत. त्या विचाराच्या पक्षातील केंद्र आणि राज्यातील अनेक नेते, मंत्र्यांना कोरोना झाला. त्यामुळे संभाजी भिडे जे बोललात ते तथ्य असेलही, असा टोला राऊतांनी लगावला आहे.

प्रकाश जावडेकर यांनी महाविकास आघाडी सरकारचा महावसुली आघाडी सरकार असा उल्लेख केलाय. त्यावर लोक मोदींच्या सरकारलाही अनेक शब्दप्रयोग वापरतात. त्यात फेकू सरकार असाही एक शब्दप्रयोग आहे. मग मोदी सरकार फेकू सरकार आहे का? असा प्रश्न संजय राऊतांनी विचारलाय. लसीच्या बाबतीत केंद्र सरकार आणि भाजपकडून अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. भाजपशासित राज्यांना लसीचा पुरवठा गरजेपेक्षा जास्त होतो. तर महाराष्ट्र सरकारच्या मागणीला केराची टोपली दाखवली जातेय. केंद्राकडून महाराष्ट्रातील जनतेच्या जीवाशी खेळ सुरु आहे. याचं उत्तर केंद्रात बसलेल्या महाराष्ट्राच्या जावडेकरांनी द्यावं. जावडेकरांना काही माहिती नाही. जावडेकर हे फक्त पत्रकार परिषदा घेतात आणि आपल्याच राज्याच्या सरहकारवर टीका करतात. हे आपल्या पुणेकर जावडेकरांना शोभा देत नाही, अशा शब्दात राऊतांना जावडेकरांना प्रत्युत्तर दिलंय.

“गेल्या 30 दिवसांमध्ये महाराष्ट्रात अशा उलथापालथी होत आहे. रोज इतके नवनवे खुलासे होत आहेत की त्यांचा ट्रॅक ठेवणंही कठीण जात आहे. एक तर स्पष्ट झालं की ही महाविकास आघाडी नसून महावसुली आघाडी आहे. यांचा किमान समान कार्यक्रम म्हणजे पोलिसांकडून पैसे गोळा करा आणि लुटा हा आहे. महाराष्ट्राच्या अब्रुची लख्तरं निघाली आहेत”, अशा शब्दात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय.

Leave a Comment