पुणे । पुण्यातील ससून रुग्णालयात एका २७ वर्षीय तरुणाचा कोरोनाने मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या या तरुणावर ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. आजसकाळी त्याचा मृत्यू झाला आहे. या तरुणाच्या मृत्यूनंतर पुण्यातील मृतांचा आकडा २६ वर पोहोचला आहे. आतापर्यंत पुण्यात केवळ ५० वर्षांवरील कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. मात्र, आता २७ वर्षांच्या तरुणाच्या मृत्यूनंतर पुणेकरांची चिंता वाढवली आहे.
मुंबई पाठोपाठ पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. मुंबईनंतर पुणे शहर कोरोनाचे केंद्रबिंदू बनलं आहे. आज पुणे शहरात १५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यातील ११ रुग्ण नायडू रुग्णालयात तर ४ जण ससून रुग्णालयात उपचार घेत आहेत. आता पुणे शहरात रुग्णांची संख्या १९० झाली असून जिल्ह्यातील संख्या २२५ झाली आहे, अशी माहिती पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
दरम्यान,या सर्व तणावाच्या परिस्थितीत एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील कोरोनाची लागण झालेले एकाच कुटुंबातील ५ जण पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे पुणे शहरात भीतीचं वातावरण आहे. मात्र, ५ रुग्ण बरे झाल्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”
या बातम्याही वाचा –
कोरोना आणि व्हायरस नावाची भानगड नक्की काय आहे ?@PawarSpeaks @rajeshtope11 @CMOMaharashtra @VarshaEGaikwad @RRPSpeaks @RohitPawarOffic #HelloMaharashtra #CoronaInMaharashtra #CoronaWarriors https://t.co/1nwSdQC4jA
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 9, 2020
भिलवाडा पॅटर्नच्या पाठीमागे 'या' तरुण महिला IAS अधिकाऱ्याचे डोके! जाणून घ्या काय आहे 'हा' पॅटर्न
@tinadabikhan या २०१५ च्या यु.पी.एस.सी. टाॅपर राहिल्या आहेत#BhilwaraModel #TinaDabi #Careernama #Career #Job #UPSC https://t.co/d9P8wbbHrx— Careernama (@careernama_com) April 10, 2020
रशियाची ग्लॅमरस टेनिसपटू शारापोव्हाने लॉकडाउनला कंटाळून शेअर केला थेट फोन नंबर@MariaSharapova #CoronavirusOutbreakindia #LockdownExtended #HelloMaharashtrahttps://t.co/gdlCkOPRbF
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 10, 2020