पुण्यात करोनाने घेतला दोघांचा बळी; राज्यातील मृतांचा आकडा वाढला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यात करोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढत चालला आहे. पुण्यात करोनामुळे बळींची संख्या ४ वर पोहोचली आहे. करोनासदृश्य लक्षणं आढळून आल्यानंतर ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या एका वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच ससूनमध्येच एका ४८ वर्षीय करोनाबाधित पुरुषाचा देखील मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हॉस्पिटल प्रशासनानं ही माहिती दिली.

कोरोना व्हायसरमुळे पुण्यात आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला. काल एका ६० वर्षीय महिलेमध्ये करोनासदृश्य लक्षणं आढळून आल्यानंतर ससून हॉस्पिटलमध्ये तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या महिलेच्या घशातील द्राव तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. हा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे मागील काही दिवसात या महिलेच्या संपर्कात कोण कोण आले त्या सर्वांचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या रोज वाढत असून रविवारी सकाळी १२ वाजेपर्यंत ही संख्या ६६१ वर गेली. पिंपरी चिंचवडमध्ये १७ नवे रूग्ण आढळले आहेत. पुण्यात ४, अहमदनगरमध्ये ३ तर औरंगबादेत नवे २ रुग्ण आढळले आहेत. अद्याप मुंबईची रविवारची आकडेवारी समोर आली नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ६६१ वर, तुमच्या जिल्ह्यात किती रुग्ण?

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?

सावधान! आज दिवे लावण्याआधी सॅनेटायझर वापरू नका, नाही तर..

पुण्यात करोनाने घेतला दोघांचा बळी; राज्यातील मृतांचा आकडा वाढला

राज्यातील लॉकडाउन काही आठवडे आणखी लांबणार?; राजेश टोपेंनी दिले संकेत

अंडरवर्ल्ड डाॅनची क्वीन’वर नजर; पॅरोलवर सुटताच डॅडी अरुण गवळीचा नवा ‘गेम

उद्धव ठाकरेंनी जिचं कौतुक केलं ‘ती’ आराध्या आहे तरी कोण..

 

 

Leave a Comment