दिल्लीतील गोळाबारीच्या घटनांवरून अनुराग ठाकूर यांच्या विरोधात संसदेत जोरदार घोषणाबाजी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्यावेळी भाषण करताना भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ”देश के गद्दारो को, गोली मारो..” अशा चिथावणीखोर घोषणा दिल्या होत्या. दरम्यान मागच्या ३ दिवसांत दिल्लीत जामिया मिलिया विद्यापीठाचा परिसर आणि शाहिनबाग परिसरात झालेल्या गोळीबारीच्या घटनामुळं विरोधकांनी भाजपाला जबाबदार धरलं आहे.

त्यानुसार अनुराग ठाकूर यांनी दिलेल्या वादग्रस्त घोषणांचे पडसाद आज संसदेतही उमटले. सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. शनिवारीच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. वित्तराज्यमंत्री या नात्यानं अनुराग ठाकूर आज लोकसभेमध्ये भाषणासाठी उभे राहताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी ‘गोली मारना बंद करो; देश को तोडना बंद करो’ अशी जोरदार घोषणाबाजी सुरु केली.

त्यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला घोषणाबाजी करणाऱ्या खासदारांना शांत राहण्याचे आवाहन केलं. “तुम्हाला लोकांनी संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पाठवले आहे, घोषणाबाजी करण्यासाठी नाही” असे ओम बिर्ला यांनी खासदारांना सुनावले. तरीही घोषणाबाजी सुरुच होती. घोषणाबाजीच्या गदारोळत अनुराग ठाकूर यांच्या समर्थानात सत्ताधारी बाकांवरून सुद्धा घोषणाबाजी झाली.

 

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

हे पण वाचा-

शेलार जर बाप काढत असतील तर आम्ही गुजरातमध्ये जाऊन बापाचा शोध घेणाऱ्यातले नाही- जितेंद्र आव्हाड

चीनमधून मालदीवच्या ७ नागरिकांची भारताने केली सुटका; परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची माहिती

चाकुचा धाक दाखवून घरातील दागिणे लंपास