मुंबई | कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातले असून भारतातही पायपसरायला सुरवात केली आहे. देशात जनता कर्फ्यूला नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. देशात आत्तापर्यंत ३४२ कोरोना पोझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ७४ वर पोहोचला आहे. यापार्श्वभुमीवर मुंबई लोकल सेवा ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे.
#Mumbai Suburban services of Western Railway will not be run from midnight today till midnight of 31st March, as a precautionary measure against the spread of Coronavirus.
— ANI (@ANI) March 22, 2020
आज २२ मार्च च्या रात्री १२ पासून मुंबइची लाईफ लाईन समजली जाणारी लोकल सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. गेल्या दोन दिवसांत रेल्वेने घराकडे निघालेल्या अनेक प्रवाशांमध्ये करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं ३१ मार्च पर्यंत रेल्वे सेवा बंद ठेवण्याची घोषणा रेल्वे मंत्रालयाने केली आहे.
विदेशातून आलेले अनेक करोना संक्रमित प्रवासी घरी जाण्यासाठी विमान प्रवासाला बगल देत रेल्वेने प्रवास करतानाच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळं रेल्वेतील गर्दी आणि संक्रमणाचा मोठा धोका लक्षात घेता रेल्वे मंत्रालयाने रेल्वे सेवा बंद करण्याची घोषणा केली आहे.
ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.
हे पण वाचा –
महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा! राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा ६४ वरुन ७४ वर
अबब! कोरोनाच्या चाचणीसाठी मोजावे लागणार तब्बल ४५०० रुपये, शासनाचे निर्देश
बॉलिवूडच्या या हॉट अभिनेत्रीने दिली थेट कोरोनाला धमकी, केला हा बोल्ड फोटो शेयर
धक्कादायक! ४ करोनाग्रस्त रुग्णांनी केला मुंबई-जबलपूर ट्रेन प्रवास
लढा कोरोनाशी : कोरोनाची भीती कमी करायला हे वाचलंच पाहिजे बरं का..!!
सोळा दिवसांच्या उपचारानंतर १३ कोरोना रुग्ण झाले ठणठणीत, भारतीय डॉक्टरांची कोरोनावर मात