मनसेनं झेंडा का बदलला? राज ठाकरेंनी दिलं हे उत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । मनसेच्या महाअधिवेशनातं राज ठाकरे यांनी झेंडा बदलण्यामागची आपली भूमिका स्पष्ट केली. मराठी बांधवानो अशी सुरवात करणाऱ्या ठाकरे यांनी या भाषणाची सुरवात माझ्या तमाम हिंदू बंधुनो अशी केली. झेंडा आवडला का असा सवाल करून सभेला सुरवात केली. या सभेत राज ठाकरे यांनी बदललेल्या झेंड्याविषयीची आपली भावनाही बोलून दाखवली.

ही कल्पना २००६ सालीच मनात असल्याचं सांगत, लोकआग्रहास्तव सोशल इंजिनीअरिंगचा नाद म्हणून रेल्वे इंजिन आणि इतर रंगांचा झेंडा निवडल्याची कबुली राज ठाकरेंनी दिली. शिवरायांचं सोशल इंजिनिअरिंग त्यावेळीपासूनच डोक्यात होतं आणि म्हणूनच अधिवेशन घेतानाच हा झेंडा लोकांसमोर ठेवल्याचं राज म्हणाले. महाराजांची राजमुद्रा ही आपली प्रेरणा असून राजमुद्रा असलेला झेंडा निवडणुकीसाठी वापरणार नसल्याचं सांगत आपण आजही मराठी आणि हिंदूच असल्याची गर्जना राज यांनी केली.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

हे पण वाचा- 

मी आजही मराठी आणि हिंदूच मात्र, प्रत्येकाने आपला धर्म घरातच पाळावा – राज ठाकरे

पाथरी हेच साईबाबांचे जन्मस्थान !! न्याय मिळावा म्हणून कोर्टात जाणार; बाबाजानी दुर्रानी यांचं मोठं

वक्तव्यराजकीय मतभेद असले तरी व्यक्तिगत पातळीवर सहकार्य; रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा