शिवसेनेची डबल ढोलकी ; स्वबळाची तयारी सुरूच ; शिवसेना भवनमध्ये आज इच्छुकांच्या मुलाखती

मुंबई प्रतिनिधी |एकीकडे शिवसेना भाजपसोबत युतीची बोलणी करत आहे. तर दुसरीकडे भाजपच्या विरोधात स्वबळाची तयारी देखील शिवसेनेने सुरूच ठेवली आहे. शिवसेनेचा हा दुटप्पीपणा का सुरु आहे. तर याचे उत्तर एकच , जर काही कारणावरून युती तुटलीच तर आपली तयारी देखील तगडी असावी असा शिवसेनेचा मानसआहे म्हणूनच शिवसेना भाजपच्या विरोधात स्वबळाची तयारी करत आहे.

आज शिवसेना भवन मध्ये इच्छुकांच्या मुलाखती घेवून शिवसेनेने भाजपवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजप स्वबळाच्या तयारीने नरमेलआणि आपल्याला जास्त जागा सोडेल हा देखील शिवसेनेचा सुप्त आशावाद असण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेच्या राजकीय डावांनाभाजप कसे उत्तर देते हे देखील बघण्यासारखे राहणार आहे.

मुंबई येथे शिवसेना भवनमध्ये आज पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाच्या इच्छुकांच्या मुलाखती पार पडत आहेत. या कार्यकर्त्यांचा असाच सूर आहे की युती झाली तर ठीक आणि नाही झाली तर त्याहून ठीक. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात नेमके काय शिजते आहे याबद्दल काहीच अंदाज वर्तवता येणार नाही. दरम्यान शिवसेना भाजप यांच्यातील युतीची बोलणी पूर्ण होत आली असून उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी हे दोघेही युतीसाठी अनुकूल असल्याचे समजते. त्याच प्रमाणे भाजप १६० जागी तर शिवसेना ११५ जागी निवडणूक लढण्याची शक्यता आहे. उर्वरित जागा मित्र पक्षांना दिल्या जाण्याची शक्यता आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com