सनी लिओनीची “द अनटोल्ड स्टोरी” कायद्याच्या कचाट्यात

0
125
thumbnail 1531575908000
thumbnail 1531575908000
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | पॉर्न स्टार सनी लिओनी ‘करनजीत कौर : द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लियोनी’ ह्या बायोपिक वेबसिरीज मुळे चर्चेत आली आहे. पॉर्नस्टार ही ओळख पुसण्यासाठी तिने फार प्रयत्न केले आहेत. त्यातील एक प्रयत्न म्हणजे द अनटोल्ड स्टोरी हा आहे. कॉलेज मध्ये शिकत असल्यापासून सनी पॉर्न चित्रपटात काम करत आहे. सुरुवातीला समलिंगी कामुक चित्रपटात काम केल्या नंतर तिने विरुद्ध लिंगी कामुक चित्रपटात काम करायला सुरुवात केली. ही सगळी कथा कॅनडात घडत होती आणि या कथेपासून तिचे आईवडील अनभिज्ञ होते. ज्यावेळी सनीने आई वडिलांना हे गुपित सांगितले त्यावेळी त्यांच्या वर जणू आभाळातून कुऱ्हाडच येऊन पडल्यासारखी स्थिती झाली. नंतर पुढे सगळे निवाळत गेले. या अशा सगळ्या कथा ‘करनजीत कौर : द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लियोनी’ या सिनेमात समाविष्ठ आहेत.
दरम्यान शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधन समितीचे मुख्य प्रवक्ते दिलजीत सिंग बेदी यांनी आक्षेप नोंदवला आहे. करनजीत कौर हे नाव वापरल्याने शीख धर्मियांच्या भावना दुखावल्या असून शिरोमणी गुरुव्दारा प्रबंधन समिती पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचे दिलजीत सिंग यांनी सांगितले. सनी ही भारतातील अत्यंत प्रसिद्ध अभिनेत्री असून दक्षिणेकडे तिचा ‘वीरमादेवी’ नावाचा चित्रपट प्रदर्शित होऊ घातला आहे. ‘करनजीत कौर : द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लियोनी’ हा चित्रपट बॉलिवूड मध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच १६ तारखे पासून ‘Z5’ या मोबाईल ऍपवर सनीची वेब सिरीज प्रदर्शित होणार आहे. परंतु दिलजीत सिंग यांनी उभा केलेल्या खटल्यामुळे सनी लिओनीची कलाकृती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here