नाशिक प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला चांगलीच गळती लागली आहे. या गळतीमुळे या दोन्ही पक्षापुढे निवडणुकीला सामोरे जाण्याचे आत्मबल कमी होत चालले आहे.अशात काँग्रेसचे ९ वेळा खासदार असलेल्या माणिकराव गावित यांची मुलगी आमदार निर्मला गावित या काँग्रेससोडून शिवसेनेत जाणार आहेत. त्यांच्या पक्षांतराने काँग्रेस एक चांगला आदिवासी समुदायाचा नेता गमावणार आहे.
पूरामुळे निवडणुका पुढे ढकण्याच्या मुद्दयांवर शरद पवारांनी केले हे विधान
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीच्या काँग्रेस आमदार निर्मला गावित या शिवसेनेच्या संपर्कात आहेत. आगामी काही दिवसात त्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. परिवर्तनाच्या राजकीय स्थितीमध्ये प्रत्येक आमदार आपली खुर्ची बळकट करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी ते भाजप सेनेत पक्षांतर देखील करत आहेत. अशा सगळ्या पक्षांतराला काँग्रेसचे माजी खासदार माणिकराव गावित यांच्या कन्या देखील अफवाद ठरणार नाहीत असेच चित्र सध्या दिसते आहे.
एमआयएम आमदार वारिस पठाण पोलिसांच्या ताब्यात?
दरम्यान दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीची उमेदवारी केलेले धनराज महाले यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी मातोश्रीवर शिवसेना प्रवेश केला आहे. दिंडोरी विधानसभा मतदारसंघ युतीत शिवसेनेकडे असल्याने महाले यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
विधानसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group Link – http://bit.ly/2MX7ZOF
WhatsApp Nambar – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra http://bit.ly/2YCtGur