राहुल आणि सोनिया गांधींना जेलमध्ये कधी टाकणार ; कॉंग्रेस नेत्याचा मोदींना सवाल

0
33
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर बोलण्यासाठी उभा राहिलेल्या कॉंग्रेसच्या लोकसभेतील नेत्याने मोदींना चांगलेच घेरले आहे. कॉंग्रेसचे आक्रमक खासदार अधीर रंजन चौधरी यांनी नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवडणुकीच्या वेळी केलेल्या भाषणाची आठवण करून देत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना जेलमध्ये कधी टाकणार असा सवाल केला.

 

भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर तुम्ही रण उठवले मात्र तुम्ही 2G घोटाळा आणि कोळसा घोटाळ्यात कोणालाही अटक करू शकले नाहीत. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना तुम्ही चोर म्हणाले आहेत. तर मग त्यांना तुम्ही जेल मध्ये का टाकत नाही. तुमचे सरकार पुन्हा सत्तेत आले आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची जागा जर जेल मध्ये आहे तर मग त्यांना तुम्ही सभागृहात का बसू देत आहेत असे अधीर रंजन चौधरी यांनी म्हणले आहे.

अधीर रंजन चौधरी यांची कॉंग्रेसने लोकसभेच्या गटनेते पदी निवड केली आहे. १६व्या लोकसभेत कॉंग्रेसचे गटनेते असणाऱ्या मल्लिकार्जुन खरगे यांचा गुलबर्गा मतदारसंघातून पराभव झाला. त्यामुळे त्यांच्या जागी अधीर रंजन चौधरी यांची निवड करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here