मुंबई प्रतिनिधी | डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी ‘आरक्षण दिले जावे, मात्र त्याचा आढावा ठराविक कालावधीनंतर घेतला जावा, असे मत मांडले होते. सरसंघचालक मोहन भागवत यांनी देखील अशीच भूमिका मांडली आहे, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलल्यावर दरवेळी अनेकांच्या टोकाच्या प्रतिक्रिया उमटतात. मात्र या विषयावर समाजातील वेगवेगळ्या स्तरातील लोकांचे काय विचार आहेत याबद्दल सुसंवाद व्हायला हवा, अशी भूमिका भागवत यांनी मांडली होती. त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून भाजपा दलितविरोधी असल्याची टीका सर्व स्तरावरून करण्यात येत आहे . यावर चंद्रकांत पाटील आपले मत व्यक्त केले आहे .
आगामी विधानसभा निवडणुकांसंदर्भात बोलताना पाटील यांनी भाजप -शिवसनेच्या युतीवरही भाष्य केले . दोन्ही पक्ष एका विशिष्ट वैचारिक विचारसरणीवर चालणारे आहेत. विद्यमान आमदारांच्या जागांना हात लावायचा की नाही हाच मुद्दा आहे. दोन्ही पक्षांची गणेशोत्सवात बैठक होईल. त्यात अंतिम निर्णय होईल. मात्र सेनेसोबत भाजपची ३०० टक्के युती होणारच , असे ते म्हणाले . विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप -शिवसेना युती करणार का , याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .