सोलापूर प्रतिनिधी | लोकसभा निव़डणुकीत वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी सांगली मतदारसंघात राष्ट्रवादीच्या संजय पाटील यांना जोरदार टक्कर दिली होती. पडळकर विजयी झाले नसले तरी आघाडीच्या नेत्यांसाठी पडळकरांसह सर्वच ठिकाणचे वंचितचे उमेदवार आव्हान ठरले होते. मतांच्या राजकारणात पडळकर यांच्या आरएसएस सोबतच्या संबंधांवरूनही टीका करण्यात आली होती. सर्व टीकी टिप्प्णींना डावलून लोकसभा निवडणुकीत पडळकर यांनी सांगलीतीतील उमेदवारांच्या मनात धडकी भरवली होती हे खरे.
धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहे. तशी जोरदार तयारी त्यांनी सुरू केली आहे. सांगोला मतदारसंघातून ते विधानसभा लढवणार असल्याची चर्चा आहे. सांगोला मतदारसंघातून आतापर्यंत शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख तब्बल १२ वेळा निवडून आले आहेत. त्यांनी यंदा विधानसभा न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पडळकरांनी सांगोला मतदारसंघात त्याचं काम वाढवलं आहे. जातीचं समिकरण पाहता या मतदारसंघात धनगर मतं अधिक आहेत. या मतांसाठी पडळकर या मतदारसंघासाठी आग्रही आहेत.
वंचितच्या कार्यकर्त्यांनी ते जत मधून लढावे अशी इच्छा दर्शवली आहे. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर पडळकरांसाठी कोणते क्षेत्र फायनल करतात याकडे सर्वांचे लक्ष असेल.
विधानसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group Link – http://bit.ly/2MX7ZOF
WhatsApp Nambar – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra http://bit.ly/2YCtGur