सांगोला प्रतिनिधी | महाराष्ट्र विधानसभेचे सर्वात जेष्ठ आमदार म्हणून ओळखले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील सांगोलचे आमदार गणपतराव देशमुख यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. गणपतराव देशमुख हे महाराष्ट्र ११ वेळा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यांच्या निवडणूक नलढण्याच्या निर्णयामुळे सांगोल्याच्या त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.
वाढत्या वयामुळे आणि प्रकृतीच्या कारणामुळे आपण आगामी विधानसभा निवडणूक लढणार नाही असे गणपतराव देशमुख यांनी म्हणले आहे. त्यांनी माघार घेतल्याने त्यांच्या जागी शेकापचे उमेदवार कोण असणार हा प्रश्न आहे. गणपतराव देशमुख यांचे पुत्र चंद्रकांत देशमुख,उद्योगपती भाऊसाहेब रुपनवर, जिल्हा परिषदेचे सदस्य सचिन देशमुख आदी गणपतराव देशमुखांचे उत्तराधिकारी होण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे या पैकी कोणाला उमेदवारी दिली जाणार हे पाहण्यासारखे राहणार आहे.
दरम्यान गणपतराव देशमुख यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने शहाजी पाटील यांचा विजय देखील पक्का झाला आहे अशी सांगोला मध्ये चर्चा आहे. शहाजी पाटील हे यावेळी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढण्याची शक्यता आहे. गतवेळी त्यांनी शिवसेनेतून निवडणूक लढून गणपतराव देशमुख यांच्यापुढे चांगले आवाहन उभा केले होते. तसेच याच शहाजी पाटील यांनी गणपतराव देशमुख यांचा १९९५ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढत अवघ्या १९२ मतांनी पराभव केला होता. गणपतराव देशमुख यांनी करुणानिधी यांचा विक्रम मोडीत काढला आहे. तसेच त्यांनी १९७८ आणि १९९९ साली स्थापन झालेल्या सरकारमध्ये मंत्रीपदे देखील भूषवली आहेत.
महत्वाच्या बातम्या
इंदापूरच्या जागेवरून पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादीत कलगीतूर ; जागा सोडण्यास शरद पवारांचा नकार
पाथरी विधानसभा ; आयात उमेदवारांना नो एंट्री ; भूमिपुत्रांची होणार चलती
मुंबईनंतर राष्ट्रवादीला बसणार नव्या मुंबईमध्ये झटका ; पवारांचा निकटवर्तीय नेता भाजपच्या वाटेवर
येडियुरप्पांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव ; मंत्रीमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा