राजकीय पेच सोडवण्यासाठी सर्व मंत्र्यांनी दिले राजीनामे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लोकशाहीत बहुमत किती महत्वाचे असते. याची प्रचीती कर्नाटकात उद्भवलेल्या राजकीय पेच प्रसंगाने करून दिली आहे. कर्नाटकमधील सरकार कोणत्याही क्षणी पडू शकते अशी परिस्थिती निर्माण झाली असताना कसल्याही परिस्थितीत सरकार वाचवण्यासाठी कॉंग्रेस आणि जेडीएस नेते प्रयत्न करत आहेत.

अशातच सर्वच मंत्र्यांनी आपले मंत्रिपदाचे राजीनामे दिले आहेत. नाराज आमदारांना मंत्री मंडळात सामवून घेण्याचे अस्त्र आता कॉंग्रेस आणि जेडीएसने आखले आहे असे चित्र सध्या दिसते आहे. कर्नाटकात सर्व काही आलबेल असून काही दिवसातच निवळलेली स्थिती आपणास बघायला मिळेल असे कुमार स्वामी यांनी म्हणले आहे.

दरम्यान जेडीएस आणि कॉंग्रेसने भाजपवर आमदारांचे अपहरण केल्याचा ठपका ठेवला आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते डी. के. शिवकुमार यांनी भाजप आमदारांचं अपहरण करत असल्याचा आरोप केलाय. ते म्हणाले, मंत्रिपदाचा राजीनामा दिलेले अपक्ष आमदार नागेश यांना फोन केला असता त्यांनी सांगितले की भाजपचे नेते येदियुरप्पा यांच्या पीएने आपलं अपहरण केलं. नागेश यांना खास विमानाने अज्ञात स्थळी नेण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.