मुंबई प्रतिनिधी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावर मागील १ वर्षांपासून काहीच बोलत नव्हते. मात्र आता मंत्री मंडळ विस्ताराच्या चर्चाना वेग आला आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रणजितसिंह मोहिते पाटील आणि राधाकृष्ण यांना चर्चेसाठी मंत्रालयात होते. येत्या १४ तारखेला शपथविधी होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या अगोदर भाजपात दाखल होऊन माढा मतदारसंघात भाजपला चांगलीच ताकद देत माढा जिंकून आणण्याचे दिव्य मोहिते पाटलांनी लीलया पेलले. त्यानंतर या कामगिरीची बक्षिशी देण्यासाठी मोहिते पाटील कुटुंबातील एका व्यक्तीचा मंत्री मंडळात समावेश करण्याचा निर्णय भाजपने केला. त्याच निर्णयाची पूर्तता करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांना सल्ला मसलतीसाठी आज मंत्रालयात बोलावले होते.
राधाकृष्ण विखे पाटील यांचा देखील मंत्रीमंडळात समावेश केला जाण्याची शक्यता आहे. त्यांना देखील मुख्यमंत्र्यांनी आज भेटीसाठी मंत्रालयात बोलावले होते. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सोबत भाजप मध्ये दाखल होणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांचे बसस्थान कसे बसवायचे या बद्दल आज विखे पाटील आणि मुख्यमंत्री यांच्यात चर्चा झाली. राधाकृष्ण विखे यांच्या सोबत सुजय विइखे देखील मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले होते.