तुम्हाला ही भाजपने ईडीची भीती घातली का ? उदयनराजे म्हणतात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी |  राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले सध्या भाजपच्या वाटेवर असतानाच याबद्दल बोलायला ते राजी नाहीत. मात्र त्यांनी त्यांच्या उत्तर देण्याच्या शैलीचा या प्रश्नासाठी पुरेपूर उपयोग केला आहे. तुम्हाला देखील भाजप प्रवेशासाठी ईडीची भीती घालण्यात आली आहे का? असा उदयनराजे प्रश्न उदयनराजे यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी अत्यंत वेगळे उत्तर दिले आहे.

राष्ट्रवादीच्या या डावपेचाने उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावर प्रश्नचिन्ह

तुम्हाला देखील भाजप प्रवेशासाठी ईडीची भीती घालण्यात आली आहे का? असा उदयनराजे प्रश्न उदयनराजे यांना विचारण्यात आला. यावर उदयनराजे म्हणाले की , माझ्यावर प्रेम करणारी एवढी येडी असताना मला भाजप प्रवेशासाठी कशाला ईडीची भीती घालेल. उदयनराजे यांनी आपल्या उत्तर देण्याच्या शैली प्रमाणेच बिनधास्त उत्तर दिले आहे.

भाजपचा सर्व्हे तयार ; महायुतीला मिळणार एवढ्या जागा

उदयनराजे भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. मात्र ते प्रवेश कधी करणार याबद्दल निश्चित सांगता येत नाही. मात्र त्यांचा प्रवेश लोकसभा निवडणुकीच्या आधी होऊ शकतो असे बोलले जाते. त्याच प्रमाणे त्यांनी पक्ष सोडू नये म्हणून राष्ट्रवादी देखील त्यांच्यावर दबाव वाढवत आहे. तसेच उदयनराजे राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये घेल्यास त्यांच्या विरोधात श्रीनिवास पाटील यांच्यासारखा तगडा उमेदवार उतरवला जाण्याची शक्यता आहे.