नवी दिल्ली | आज अर्थसंकल्पीय अधिवेशनातील महत्वाचा भाग असणऱ्या राष्ट्रपती अभिभाषणाची कार्यवाही पार पडली. या अभिभाषणा वेळी राहुल गांधी आपल्या मोबाईल मध्ये चाटिंग करण्यात दंग होते. राष्ट्रपतींचे अभिभाषण सुरु असताना राहुल गांधी यांनी २४ मिनिटे आपले डोके मोबाईल मधूनवर देखील काढले नाही. तर सोनिया गांधी यांनी त्यांना सावध करण्याचा प्रयत्न केला तरी देखील राहुल गांधी यांनी मोबाईल मधून डोकेवर काढले नाही.
राष्ट्रपतींनी भाषण सुरु केल्यानंतर पहिली २४ मिनिटे राहुल गांधी मोबाईलमध्ये काही तरी टाईप करत होते. त्यानंतर देखील त्यांनी राष्ट्रपतींचे भाषण ऐकण्याऐवजी ते शेजारी बसलेल्या सोनिया गांधी यांच्याशी बोलत होते. एका बाजूला राष्ट्रपतींचे भाषण सुरु असताना राहुल गांधी मात्र मोबाईलची स्क्रिन पाहण्यात व्यस्त होते. राष्ट्रपतींचे भाषण अखेरच्या टप्प्यात पोहोचल्यानंतर राहुल गांधींनी राष्ट्रपतींच्या भाषणावर बेंचला हात लावला. राष्ट्रपतींच्या भाषणाच्या पहिल्या ४० मिनिटात त्यांनी बेंच वाजवून अनुमोदन दिले नाही. राहुल गांधींनी भाषण संपण्यावेळी अखेरच्या काही सेंकदावेळी बेंच वाजवला. तर शेजारी बसलेल्या सोनिया गांधी यांनी राष्ट्रपतींच्या भाषणा दरम्यान ६ वेळा बेंच वाजवला. १७ व्या लोकसभेत सर्वाधिक महिला खासदार निवडूण आल्या आहेत आणि मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या उल्लेखावेळी सोनिया गांधी यांनी बेंच वाजवला. पण तेव्हा राहुल गांधी मात्र मोबाईलमध्ये बघत होते.
राष्ट्रपतींनी भाषणात जेव्हा सर्जिकल स्ट्राईक आणि बालाकोट एअर स्ट्राईकचा उल्लेख केला. तेव्हा खासदारांनी सर्वाधिक वेळ बेंच वाजवला. तेव्हा सोनिया गांधींनी देखील बेंच वाजवला पण राहुल गांधी खाला पाहात शांत बसले होते. राष्ट्रपतींच्या भाषणा दरम्यान सोनिया गांधींनी अनेक वेळा राहुल गांधींकडे पाहिले पण ते तसेच मोबाईलमध्ये पाहत बसले होते.