सांगली प्रतिनिधी | भिडे गुरुजी आणि त्यांचे हिंदुस्थान प्रतिष्ठान पूराचे पाणी ओसरलेल्या भागात स्वच्छतेचे काम करत आहेत. कामात व्यस्थ असलेल्या भिडे गुरुजीसोबत माध्यमांच्या प्रतिनिधीने संवाद साधला असता भिडे गुरुजींना पूराने केलेला विध्वंस बघून अश्रू अनावर झाले. गोर गरिबांच्या घराची झालेली नासधूस बघून मला अत्यंत दुःख होत आहे अशी भावना भिडे गुरुजींनी यावेळी व्यक्त केली.
सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात आलेले पूराचे हे ना भूतो ना भविष्यते असेच होते. लोक २००५ साली आलेला पूर हा सर्वात मोठा पूर होता असे म्हणत त्याआधी ६० वर्षांपूर्वी असा पूर आला होता असे देखील म्हणत. परंतु यावर्षी आलेला पूर हा सर्व रेकॉर्ड मोडणारा पूर आहे असे भिडे गुरुजी म्हणाले आहेत. भिडे गुरुजी पूरग्रस्तांना मदत करण्यामध्ये कुठे दिसत नाहीत अशी टीका तुमच्यावर होते असा प्रश्न भिडे गुरुजींना विचारल्यावर गुरुजींनी फार हलक्या स्वरात टीकाकारांना आपलेसे करणारे उत्तर दिले. ही वेळ आरोप प्रत्यारोप करण्याची नाही. एकादे लेकरू आई वडिलांना जास्त छळते. त्रास देते म्हणून आई वडील काय त्या लेकरावर प्रेम लावायचे सोडून देतात का असा प्रति सवाल करून भिडे गुरुजींनी त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना उत्तर दिले आहे.
दरम्यान हिंदुस्थान प्रतिष्ठानच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांनी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात येऊन पूर स्थितीतून जनजीवन पूर्व पदावर असण्यात हातभार लावला आहे. त्याच प्रमाणे भिडे गुरुजींनी सर्व नगरसेवक आमदार खासदार आणि सरपंच यांना आपल्या कार्यकर्त्यांसहित पाणी ओसरलेल्या भागात स्वच्छतेचे काम करण्याचे आवाहन केले आहे.
विधानसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group Link – http://bit.ly/2MX7ZOF
WhatsApp Nambar – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra http://bit.ly/2YCtGur
तर मी शिवसेनेची हमी घेतो : रावसाहेब दानवे
पूरग्रस्तांच्या सेवेसाठी शिवसेनेने पाठवले १०० डॉक्टर
महाराष्ट्र भाजपच्या लोकप्रतिनिधींनी १ महिन्याचे वेतन पूरग्रस्तांना द्यावे : चंद्रकांत पाटील
पूरग्रस्तांना धमकी द्यायला चंद्रकांत पाटील हे जनरल डायर आहेत का : राष्ट्रवादी