सोलापूर प्रतिनिधी | माढा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक पराभूत झालेले संजय शिंदे राष्ट्रवादीचा कधीकाळी बालेकिल्ला असलेल्या करमाळा विधानसभा मतदारसंघावर दावा सांगणार का असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र आज अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या मुलाखतीत मात्र संजय शिंदे यांनी आपला दावा करमाळ्यावर सांगितला नाही त्यामुळे बागल कुटूंबियांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
महालक्ष्मी एक्सप्रेस पाण्यात अडकली ; अतिवृष्टीने रेल्वे ट्रॅक पाण्याखाली ; बचाव कार्य तातडीने सुरु
२०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत करमाळा मतदारसंघातून संजय शिंदे यांनी शेतकरी संघटनेकडून तर रश्मी बागल यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती. त्यावेळी या दोघांमध्ये मतांचे ध्रुवीकरण होऊन शिवसेनेचे नारायण पाटील विजयी झाले होते. संजय शिंदे यावेळी राष्ट्रवादी कडून करमाळ्याचे उमेदवारी मागणार असे चित्र सध्या होते पात्र त्यांनी उमेदवारी मागितीला नाही त्यामुळे त्यांची राजकीय गणिते नेमकी काय आहेत हे बघण्यासारखे राहणार आहे.
बारामतीकरांचा विश्वासघात ; इंदापूर काँग्रेसला सोडणार नाही ; हर्षवर्धन पाटील भाजपच्या वाटेवर
संजय शिंदे हे अपक्ष उमेदवारी करून निवडून आल्यावर भाजपला पाठिंबा देतील आणि भाजप सोबत त्यांचे जे वितुष्ट निर्माण झाले आहे. ते वितुष्ट संपुष्ठात आणून आपला साखर उदयोग अबाधित राखतील असा अंदाज राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जातो आहे. मात्र संजय शिंदे यांच्यासाठी करमाळ्याचे राजकारण यावेळी देखील मानवणार नाही कारण एकतर त्यांच्या माथी पराभवाचा ठपका लागला आहे दुसरी बाब म्हणजे नारायण पाटील यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल असणारे गुडविल यामुळे संजय शिंदे यांना विधान सभा सोपी नसणार आहे.
चौकशीच्या भीतीने लोक पक्ष सोडत आहेत : अजित पवार
संसदेच्या अंदाज समितीच्या अध्यक्षपदी गिरीश बापट यांची नियुक्ती
मुंबई अध्यक्षांसोबत प्रदेशाध्यक्ष देखील राष्ट्रवादी सोडणार
इच्छुकांच्या मुलाखतीला अजित पवार सोलापुरात ; दोन आमदारांनी मारलेल्या दांडीने राष्ट्रवादीत खळबळ
२७ जुलै रोजी छगन भुजबळांचा शिवसेनेत प्रवेश!