मी साखर उद्योगात पडलो तुम्ही पडू नका : नितीन गडकरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | साखर उद्योगाला आता बरे दिवस राहिले नाहीत आणि येत्या काळात देखील त्याला काही भवितव्य दिसत नाही असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. एवढेच बोलून नितीन गडकरी थांबले नाहीत. तर त्यांनी साखर उद्योगात मी पडलो तुम्ही पडू नका असा चिमटा देखील काढला. ते पुण्यात आयोजित साखर परिषदेत बोलत होते. साखर उद्योग आणि त्यामधील समस्यांवर उपाय साधण्यासाठी या परिषदेत चर्चा करण्यात आली.

इथेनॉल निर्मिती केली तरच साखर उद्योगाला बरे दिवस येथील अन्यथा हा व्यवसाय मोडीत निघेल असे परखड मत नितीन गडकरी यांनी या परिषदेत व्यक्त केले आहे. साखर उद्योगातील सर्वात मोठी समस्या हि साखरेचे होणारे भरमसाठ उत्पादन हीच आहे. म्हणून मी साखर उद्योगात पडलो तुम्ही पडू नका असा सल्ला नितीन गडकरी यांनी दिला आहे.

एका मर्यादेपलीकडे सरकार साखर उद्योगाला मदत करू शकत नाही. त्यामुळे इथेनॉल निर्मिती करून साखर कारखानदारांनी आपल्या अडचणी भगवाव्या असा सल्ला नितीन गडकरी यांनी साखर कारखानादारांना दिला आहे. शिखर बँकेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर शरद पवार देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Leave a Comment