सोलापूर प्रतिनिधी | सरकार सूड बुद्धीने विरोधी पक्षांच्या नेत्यांवर ईडी , सीबीआय आणि अँटी करप्शनच्या कारवाह्या करत आहे. त्यामुळे विरोधी पक्षातील बरेचशे लोक भाजपमध्ये दाखल होत आहेत. एकीकडे ईडीच्या कारवाहीची नेत्यांमध्ये दहशत असतानाच सुप्रिया सुळे यांनी मात्र माझ्या विरोधात ईडीची नोटीस सरकारने काढून दाखवावी असे ओपन चॅलेंज दिले आहे.
जर तुम्हाला ईडीची नोटीस आली तर तुम्ही तरी देखील सरकारच्या विरोधात आवाज बुलंद करत राहणार का असा प्रश्न पत्रकाराने सुप्रिया सुळे यांना विचारला होता. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या मी काही काळबेर केलच नाही. तर सरकार माझ्या विरोधात ईडीची नोटीस कशी काढणार. माझं तर ओपन चॅलेंज आहे सरकारने माझ्या विरोधात नोटीस काढूनच दाखवावी. सुरुवातीला ते त्रास देण्याचा प्रयत्न करतील मात्र मीच जिंकणार असा विश्वास देखील सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.
‘ताईंशी संवाद’ या कार्यक्रमांतर्गत सुप्रिया सुळे या सोलापूर दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी डॉक्टर , वकील,शिक्षक, तरुण यांच्या सोबत संवाद साधला. तसेच व्यापाऱ्याच्या समस्या देखील त्यांनी जाणून घेतल्या. मला सीबीआयची अथवा ईडीची नोटीस आली तरी मला फरक पडत नाही. मी संघर्ष करत आहे. मी संघर्ष करत राहणार असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.