आमचं ठरलयं ! सतेज पाटील ‘या’ पक्षाकडून लढवणार विधानसभा

कोल्हापूर प्रतिनिधी | महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक गाजली ती ‘आमचं ठरलय वार फिरलय’ या वाक्याने. महाराष्ट्रातील महत्वाचा आणि राजकीय दृष्ट्या संवेदनशील असणारा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ यावेळी शिवसेनेने जिंकला. मात्र हि निवडणूक शिवसेना-राष्ट्रवादी अशी नरंगता धनंजय महाडिक विरुद्ध सतेज पाटील अशी निवडणूक रंगली होती. यात सतेज पाटील यांनी बाजी मारली आहे. मात्र सतेज पाटील विधानसभा कोणत्या पक्षाकडून लढवणार या विषयी अनेक तर्क वितर्क लावले जात होते. मात्र या सर्व चर्चाना आता पूर्ण विराम लावला जाणार आहे असे दिसते आहे.

विधानसभा निवडणूक २०१९ : महाराष्ट्रातील ‘या’ मतदारसंघात होणार चुलत्या पुतण्याची लढाई

काँग्रेस पक्षाची सध्या विधानसभा अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरु आहे. ६ जुलै पर्यंत मुंबईच्या प्रदेश कार्यालयात इच्छुक नेत्यांना आपला उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे. या काँग्रेस पक्षाच्या प्रक्रियेत सतेज पाटील सहभागी होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सतेज पाटील काँग्रेस पक्षाकडून कोल्हापूर दक्षिण या विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. ते काँग्रेस मधूनच लढू इच्छित आहेत. दरम्यान सतेज पाटील हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशा चर्चा कोल्हापुरात रंगली होती. मात्र या चर्चेला सतेज पाटील यांनी छेद दिला आहे.

तुमच्या आमच्या हृदयात भगवा आहे ; दिल्लीत गेलो तरी लढाई जिंकू : उद्धव ठाकरे

२०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीला सतेज पाटील यांचा पराभव घडवून आणण्यासाठी धनंजय महाडिक यांनी मोठे प्रयत्न केले. कारण स्व:ताचे बंधू अमल महाडिक निवडून यावे असे त्यामागचे उघड राजकारण होते. अमल महाडिक यांना निवडून आणणे धनंजय महाडिक यांना महागात पडणार हे सर्वच जन बोलत होते त्याची प्रचीती या निवडणुकीला आली . कारण आमचं ठरलय वार फिरलय हा फॅक्टर लोकसभेला चांगलाच गाजला आणि धनंजय महाडिक यांचा दारुण पराभव झाला.

पेट्रोल डीझेल होणार महाग | पाणी संकटावर मात करण्यासाठी केंद्र सरकार लावणार पेट्रोल डिझेलवर कर