सातारा प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहतील असे बोलले जात होते. परंतु मोदी उपस्थित राहिले नाहीत आणि सर्वांना चर्चेसाठी एक नवा विषयच मिळाला. त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साताऱ्यात पत्रकारांनी विचारना केली असता त्यांनी पत्रकारांना या संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे.
पंतप्रधान हे पद घटनादत्त आहे. त्यामुळे पंतप्रधान पक्षीय प्रवेश कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाहीत. आजवर तसा प्रोटोकॉल पाळण्यात आला आहे. म्हणून उदयनराजेंच्या प्रवेशाला पंतप्रधान उपस्थित राहिले नाहीत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
उदयनराजेंच्या प्रवेशाने राष्ट्रवादीला सर्वात मोठा धक्का बसला आहे. आता राष्ट्रवादी सातारा लोकसभेची जागा नलढवता काँग्रेसला देण्याच्या तयारीत आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या जागेवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेस लढण्याचे आदेश देण्याची शक्यता आहे. त्यामुळे सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीला चांगलाच रंग चढण्याची शक्यता आहे.