नवी दिल्ली । पॅट कमिन्स (Pat Cummins) नंतर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रेट ली (Brett lee) भारतीयांना मदत करण्यासाठी पुढे आला आहे. ब्रेट लीने भारतातील रूग्णालयात ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी 1 बिटकॉइन (सुमारे 42 लाख रुपये) दान केले आहे. तत्पूर्वी, आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये कोलकाता नाइट रायडर्स (KKR) कडून खेळणारा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने देखील भारतीय रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवण्यासाठी ‘पीएम केअर्स फंड’ मध्ये 50,000 डॉलर्स (सुमारे 37 लाख रुपये) दान दिले. यावेळी कमिन्सने सहकारी खेळाडूंनाही दान देण्याचे आवाहन केले.
Well done @patcummins30 🙏🏻 pic.twitter.com/iCeU6933Kp
— @BrettLee_58 (@BrettLee_58) April 27, 2021
एका निवेदनात ब्रेट ली म्हणाला,”भारत हे माझे दुसरे घर आहे. माझ्या क्रिकेट कारकिर्दीत येथील लोकांकडून मला मिळालेले प्रेम आणि निवृत्तीनंतर माझ्या हृदयात याचे एक विशेष स्थान आहे. या संकटात लोकांना मरताना पाहून दुःख होते आहे. त्यांना मदत करण्यासाठी हे थोडेसे योगदान देण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य आहे. मी www.cyptorelief.in वर एक बिटकॉइन दान करीत आहे आणि त्याच्या माध्यमातून भारतातील विविध रुग्णालयात ऑक्सिजन पुरविला जाईल.”
पॅट कमिन्सने ‘पीएम केअर्स फंडात’ दिले37 लाख रुपये
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू पॅट कमिन्सने एक निवेदन जारी करत म्हंटले होते कि,” भारत हा असा देश आहे जेथे मला गेल्या काही वर्षांपासून खूप प्रेम मिळत आहे आणि इथली लोकं देखील खूप प्रेमळ आणि सपोर्टिंग आहेत. मला माहित आहे की, या देशात कोरोना विषाणूमुळे यापूर्वीच अनेक समस्या उद्भवल्या आहेत.” याआधीच पॅट कमिन्सने पीएम केअर्स फंडात मदत म्हणून 37 लाख रुपये दिले आहेत. ब्रेट लीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यापूर्वीही अनेक प्रसंगी तो भारतीयांसाठी बोलला आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा