लग्नाच्या मांडवात ‘दंगल’चा थरार; नवरा – बायकोची तुफान हाणामारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही लग्न नेहमी आठवणीत राहतात कारण त्या लग्नात घडलेल्या काही घटनांमुळे. मग काही चांगल्या गंमतीदार तर कधी भयानक घटना घडतात. त्याचा व्हिडिओही नंतर व्हायरल होतो. अशाच एका लग्नातील व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे तो म्हणजे नवरा आपल्या नवरीला पेढा भरवत असतो. तेव्हा नवरी त्याला विरोध करत नवऱ्याला ढकलून देते. पुढे याचे रूपांतर जोरात हाणामारीत होते.

व्हायरल झालेल्या व्हिडिओत वधू-वर स्टेजवरच उभे असतात. तेव्हा त्यांच्यामध्ये एकमेकांना मारहाणीचा प्रकार सुरु होतो. नवरदेव बळजबरीनं नवरदेवाला मिठाई खाऊ घालण्याचा प्रयत्न करत असतो पण नवरीला हे अजिबात आवडत नाही आणि ती लगेच नवरदेवाचा हात काढून त्याला जोरदार चोप देते. काऐवजी दोनदा नवरदेवाला थप्पड मारते. यानंतर लग्नाचा स्टेज हा कुस्तीचा आखाडा बनतो. त्यात वधू-वरांमध्ये भरपूर बॉक्सिंग होते, त्यांच्याकडून एकमेकांचे केस ओढले जातात.

हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @gharkekalesh नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे. 27 सेकंदाचा हा व्हिडिओ आहे, तर शेकडो लोकांनीही हा व्हिडिओ लाईक करत विविध प्रकारच्या मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.