काळाचा घाला! डॉक्टरांकडे उपचारांसाठी जात असताना सख्ख्या बहीण भावाचा दुर्दैवी मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वैभववाडी : हॅलो महाराष्ट्र – आजकाल कधी काय होईल सांगता सांगता येत नाही. कधी कोणाला मरण येईल याचा काही नेम नाही. सिंधुदुर्गच्या वैभववाडी तालुक्यात अशीच काहीशी घटना घडली आहे. एक तरुण आपल्या विवाहित बहीणीला तिची तब्येत बरी नाही म्हणून रुग्णालयात घेऊन जात होता. या दरम्यान वाटेत भीषण अपघात (Accident) झाला आणि यामध्ये दोन्ही बहिण-भावाचा दुर्देवी अंत झाला. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय घडलं?
संबंधित घटना ही आज सकाळी सोनाळी नजीक घडली. कोळपे येथील शालेय विद्यार्थी आपल्या विवाहित बहिणीला वैभववाडी रुग्णालयात डॉक्टरकडे घेऊन जात होता. तर काँक्रीट मिक्सरचे वाहन हे उंबर्डेहून वैभववाडीच्या दिशेने येत होते. यावेळी सोनाळी नजीक मोटरसायकल आणि काँक्रीट मिक्सर वाहन यांच्यात धडक झाली. आणि या भीषण अपघातात (Accident) बहीण भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या डोक्यावरून वाहनाचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

कोळपे गावात मुख्तार महंमद थोडगे याचे परिवार राहते. मुख्तार हा 12वीत शिकत होता. तर त्याची बहीण मोमीना नावळेकर ही विवाहीत असून तिला दोन महिन्यांची मुलगी आहे. ती काही कामानिमित्त घरी आली होती. तर तिची आज तब्बेत बिघडली होती. त्याकारणाने मुख्तार हा दुचाकीने बहीणीला घेऊन वैभववाडी येथे डॉक्टरकडे जात होता. दरम्यान मुख्तारच्या दुचाकीचा आणि समोरून येणाऱ्या मिक्सर वाहनाची घडक झाली. त्यात मुख्तार त्याच्या बहिणीसह खाली कोसळले. याचवेळी त्या मिक्सर वाहनाचे चाक दोघांच्या ही डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर मिक्सर वाहन चालक पसार झाला आहे. त्यामुळे अपघाताने (Accident) कोळपे गावावर शोककळा पसरली आहे. पोलीस त्या मिक्सर वाहन चालकाचा शोध घेत आहेत.

हे पण वाचा :
हँडल न पकडता रस्त्याच्या मधोमध चालवत होता बाइक; स्टंट पाहून तुम्ही थक्क व्हाल

दारू ढोसून पतीचे हैवानी कृत्य ! पत्नीची गळा आवळून केली हत्या

IND vs SA T-20 : क्रिकेट मॅचच्या दरम्यान स्टेडिअममध्येच एकमेकांबरोबर भिडले फॅन्स

शिवसेनेच्या राज्यसभेतील पराभवामागे राष्ट्रवादीचेच षडयंत्र; भाजपच्या ‘या’ खासदाराने केले मोठे विधान

सातारा जिल्ह्यात भरारी पथकाकडून 2 कोटीचे बोगस बियाणे जप्त

 

Leave a Comment