व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

शिवसेनेच्या राज्यसभेतील पराभवामागे राष्ट्रवादीचेच षडयंत्र; भाजपच्या ‘या’ खासदाराने केले मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारला भाजपने चांगलाच धक्का दिला. या निवडणुकीत भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून आले. आता निवडणुकीत महाविकास आघाडीत कुणी दगाफटका केला याचा शोध घेतला जात आहे. अशात आता भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला जात आहे. भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादी व शिवसेनेबाबत एक मोठे विधान केले आहे. कोल्हापूरच्या संजय पवार यांच्या पराभवामागे राष्ट्रवादी काँग्रेसचा हात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा खेळ करणारा पक्ष आहे. शिवसेनेला संपवण्याचे काम राष्ट्रवादीकडून सुरू आहे असे विखे पाटील म्हणाले.

सुजय विखे पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोपही केले. ते म्हणाले की, नुकतीच राज्यसभेची निवडणूक झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्याच शिवसेनेला दगा दिला आहे. हे मुख्यमंत्र्यानी वेळीच लक्षात घ्यावे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस हा एक असा पक्ष आहे कि तो खेळ करतो. हा खेळ करणारा पक्ष आहे. शिवसेनेला संपवण्याचे काम हे राष्ट्रवादीकडून सध्या सुरू आहे.

राष्ट्रवादीकडून अनेकप्रकारची षडयंत्र रचली गेली आहेत. कोल्हापुरातील उमेदवाराच्या बाबतीतही अशाच प्रकार घडला आहे. कोल्हापुरात संजय पवार यांना शिवसेनेने उभे केले. मात्र, त्यांना पाडण्यामागे राष्ट्रवादीचेच षडयंत्र आहे. त्याचे हे षडयंत्र मुख्यमंत्र्यांनी वेळीच ओळखावे आणि राष्ट्रवादीपासून दूर व्हावे”,असे विखे पाटील यांनी म्हंटले.