कल्याण : हॅलो महाराष्ट्र – मुंबईजवळ असणाऱ्या उंभरणी गावात नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये आरोपीने आपल्या वहिनीची निर्घृणपणे हत्या केली आहे. त्याने वाहिनीची हत्या केल्यानंतर वाहिनीने आत्महत्या केल्याचा बनाव रचला होता. पण त्याचा हा बनाव फार काळ टिकू शकला नाही. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी आरोपीला 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कल्याण तालुका पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
सुरेश त्र्यंबक वाघे असे अटक करण्यात आलेल्या आरोपी दिराचे नाव आहे. तर धृपदा जयराम वाघे असे हत्या करण्यात आलेल्या वहिनीचे नाव आहे. मृत धृपदा जयराम वाघे यांचा मृतदेह 6 फेब्रुवारी रोजी आपल्या राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. यानुसार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती.
अशा प्रकारे झाला खुनाचा उलघडा
जेव्हा मृत धृपदा यांचा जेव्हा शवविच्छेदन अहवाल तेव्हा त्यामध्ये हि आत्महत्या नाहीतर खून असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यास सुरुवात केली. या चौकशी दरम्यान मृत धृपदा यांच्या बहिणीने धृपदा यांचा आरोपी दीर सुरेश वाघे यांच्याशी वाद असल्याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी आरोपी दिराला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तेव्हा त्याने मृत धृपदा आणि आपल्यात संपत्ती आणि पैशांचा वाद असल्याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी आरोपी दिराची कसून चौकशी केली असता त्याने जमीन आणि पैशांच्या वादातून आपल्या भावाची पत्नी धृपदा हिचा गळा आवळून खून केला. यानंतर पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केलं असता, त्याला 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.