हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । BSNL : सध्याच्या काळात स्मार्टफोनचा वापर वाढतच चालला आहे. अशातच टेलिकॉम कंपन्या देखील ग्राहकांसाठी अनेक आकर्षक प्लॅन सादर करत आहेत. अनेक मोठ्या किंमतीच्या प्लॅन सोबतच कमी कमिटीचे बजट प्लॅन्स देखील खूप लोकप्रिय आहेत. जर आपल्यालाही 50-60 रुपयांच्या बजटमध्ये एखादा प्रीपेड प्लॅन हवा असेल तर डेटा आणि कॉलिंगचे फायदे देणाऱ्या काही प्लॅन्सबाबत जाणून घेउयात…. या छोट्या रिचार्ज प्लॅनद्वारे प्लॅन संपल्यानंतर आपल्याला इंटरनेटचा लाभ तर मिळेलच त्याचबरोबर कॉलिंगही करता येईल.

Airtel चा 58 रुपयांचा प्लॅन
Airtel च्या ‘या’ 58 रुपयांच्या प्लॅनमध्ये एकूण 3GB डेटा मिळतो. व्हॅलिडिटीबाबत बोलायचे झाल्यास, हा प्लॅन सुरु असलेल्या प्लॅनच्या व्हॅलिडिटी इतका चालेल. मात्र या प्लॅनमध्ये फ्री व्हॉईस कॉलिंग किंवा फ्री SMS मिळणार नाहीत. BSNL

Jio चा 50 रुपयांचा प्लॅन
Jio च्या ‘या’ 50 रुपयांच्या प्लॅनमध्ये कोणताही डेटा मिळणार नाही. मात्र, या प्लॅनमध्ये 39.37 रुपयांचा टॉकटाइम देण्यात आला आहे. तसेच या प्लॅनसाठी कोणतीही व्हॅलिडिटी नसेल. BSNL

BSNL चा 49 रुपयांचा प्लॅन
BSNL च्या ‘या’ 49 रुपयांच्या प्लॅनमध्ये एकूण 1GB डेटा दिला जाईल. यासाठी 20 दिवसांची व्हॅलिडिटी असेल. तसेच यामध्ये व्हॉईस कॉलिंगसाठी 100 मिनिटे मिळतील. मात्र, यामध्ये स्वतंत्र फ्री व्हॉईस कॉलिंग किंवा फ्री SMS मिळणार नाही.

Vodafone Idea चा 49 रुपयांचा प्लॅन
Vodafone Idea च्या ‘या’ 49 रुपयांच्या प्लॅनमध्ये एकूण 100MB डेटा दिला जातो. तसेच या प्लॅनची व्हॅलिडिटी 10 दिवसांची असेल. व्हॉईस कॉलिंगसाठी, या प्लॅनमध्ये 38 रुपयांचा टॉकटाइम मिळणार आहेत. मात्र हे लक्षात घ्या कि, यामध्ये एका कॉलसाठी 2.5 पैसे/सेकंद शुल्क आकारले जाते. BSNL
जर या सर्व प्लॅनकडे नजर टाकली तर BSNL चा प्लॅन हा इतर टेलिकॉम कंपन्यांच्या प्रीपेड प्लॅनवर भारी पडतो. कारण यामध्ये डेटासह व्हॉईस कॉलिंगचा देखील लाभ मिळतो.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://portal.bsnl.in/myportal/quickrecharge.do
हे पण वाचा :
Karnataka Bank ने सुरु केली नवीन कालावधीची FD, बघा किती मिळतंय व्याज !!!
Investment Tips : मजबूत नफा मिळवण्यासाठी श्री गणेशाकडून समजून घ्या गुंतवणुकीच्या ‘या’ 7 टिप्स !!!
आता तिकीट कॅन्सलेशन चार्जवर देखील आकारला जाणार GST, रेल्वे विभागाने म्हटले कि…
PM Kisan चा 12 वा हप्ता हवा असेल तर उद्यापर्यंत करावी लागेल eKYC, जाणून घ्या संपूर्ण पद्धत
EPFO च्या सदस्यांना आता डिजीलॉकरद्वारे डाउनलोड करता येतील ‘ही’ महत्त्वाची कागदपत्रे !!!




