Budget 2022: ‘या’ मोबाइल अ‍ॅपवर मिळणार संपूर्ण बजटची माहिती, ‘अशा’ प्रकारे करा डाऊनलोड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2022 रोजी म्हणजेच मंगळवारी सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर करतील. सर्वसामान्यांना अर्थसंकल्पाची माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी सरकारने मोबाइल अ‍ॅप लाँच केले आहे. संपूर्ण बजट या अ‍ॅपवर हिंदी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध असेल. अर्थमंत्री सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर लवकरच या अ‍ॅपवर बजट उपलब्ध होईल.

मोबाईल अ‍ॅपवर युझर्स आपल्या सोयीनुसार बजट हिंदी किंवा इंग्रजीमध्ये पाहू शकतील. युनियन बजट मोबाईल अ‍ॅप असे या अ‍ॅपचे नाव आहे. हे बजट अ‍ॅप http://indiabudget.gov.in वरून डाउनलोड करता येईल.

संसद अ‍ॅप वर बजट लाईव्ह पहा
बजट-2022 लाईव्ह मोबाईलवर पाहता येईल. यासाठी डिजिटल संसद नावाचे अ‍ॅप लॉन्च करण्यात आले आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की,” डिजिटल संसद अ‍ॅप वर संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण, सभागृहांच्या दैनंदिन कामकाजाची माहिती, तसेच सभागृहाच्या पटलावर ठेवण्याच्या पत्राबरोबरच 1947 पासून आतापर्यंत अर्थसंकल्पावर झालेली चर्चा देखील उपलब्ध आहेत. या अ‍ॅपवर तुम्ही सर्वसाधारण बजट लाईव्ह पाहू शकाल.”

पहिल्यांदाच हलवा सोहळा रद्द
दरवर्षी अर्थसंकल्पापूर्वी होणारा ‘हलवा सोहळा’ यावेळी ओमिक्रॉनमुळे रद्द करण्यात आला आहे. भारताच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा ही प्री-बजट परंपरा पाळली जात नाही. दिल्लीतील साथीच्या आजाराची धोकादायक परिस्थिती पाहता हे पाऊल उचलण्यात आल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. अर्थसंकल्प 2022 ची तयारी अंतिम टप्प्यात आहे. अशा परिस्थितीत संसर्गाचा धोका आणि हेल्थ प्रोटोकॉल लक्षात घेऊन यावेळी मुख्य कर्मचाऱ्यांना मिठाई वाटण्यात आली आहे. अर्थसंकल्प तयार करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना कामाच्या ठिकाणीच ‘लॉक इन’ मोडमध्ये ठेवण्यात आले आहे.

Leave a Comment