हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Budget 2023 : आज 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. ज्यामध्ये अर्थमंत्र्यांकडून नोकरदार वर्ग, व्यवसायापासून ते गरीब-शेतकरी आणि महिलांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या. यासोबतच सरकारने पेन्शनधारकांनाही दिलासा दिला आहे. आता देशात पहिल्यांदाच फॅमिली पेन्शनधारकांना स्टँडर्ड डिडक्शनचा लाभ मिळणार आहे. फॅमिली पेन्शन ही अशी पेन्शन आहे जी एखाद्या कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तीला दिली जाते.
आज संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात याबाबत म्हंटले की,” आता फॅमिली पेन्शन मिळवणाऱ्या पेन्शनधारकांना देखील 15,000 रुपयांची स्टँडर्ड डिडक्शन मिळू शकेल. तसेच फॅमिली पेन्शन मिळवणारे वगळता, पहिल्यांदाच इतर पेन्शनधारक आणि पगारदार कर्मचाऱ्यांना स्टँडर्ड डिडक्शनचा लाभ मिळत आहे. या अंतर्गत आता त्यांना 50,000 रुपयांपर्यंत सूट मिळेल. Budget 2023
किती लाभ मिळणार???
हे जाणून घ्या कि, या वर्षीच्या अर्थसंकल्पात पहिल्यांदाच कोणत्याही अर्थमंत्र्यांकडून फॅमिली पेन्शनसाठी स्टँडर्ड डिडक्शनचा लाभ जाहीर केला गेला आहे. ज्यामुळे आता फॅमिली पेन्शन घेणाऱ्या व्यक्तीचे करपात्र उत्पन्न देखील एकूण उत्पन्नातून 15,000 रुपये वजा करून मोजले जाईल. Budget 2023
स्टँडर्ड डिडक्शन म्हणजे काय ते समजून घ्या
स्टँडर्ड डिडक्शन ही वजावट आहे जी इन्कम टॅक्स भरणाऱ्याच्या उत्पन्नातून वजा केली जाते आणि त्यानंतर उर्वरित उत्पन्नावर टॅक्स मोजला जातो. हे एका उदाहरणाद्वारे समजून घेउयात, समजा नोकरी करणाऱ्या एखाद्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपये आहे. अशा परिस्थितीत, जर एकूण पॅकेजमध्ये 50,000 रुपयांपर्यंतच्या स्टँडर्ड डिडक्शनचा लाभ मिळत असेल, तर त्यांचा टॅक्स 8 लाख रुपयांऐवजी 7,50,000 रुपयांवर मोजला जाईल. Budget 2023
2005 च्या आधी भारतात पगारदार व्यक्तींसाठी स्टँडर्ड डिडक्शनची तरतूद करण्यात आली होती. मात्र 2005 च्या अर्थसंकल्पात ती बंद करण्यात आली. यानंतर 2018 च्या अर्थसंकल्पात, मोदी सरकारने स्टँडर्ड डिडक्शन पुन्हा लागू करून ट्रांसपोर्ट अलाउंस आणि मेडिकल रीइंबर्समेंटच्या स्वरूपात उपलब्ध असलेली सूट रद्द केली. Budget 2023
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://incometaxindia.gov.in/Pages/default.aspx
हे पण वाचा :
Railway Budget 2023 : रेल्वेसाठी 2.4 लाख कोटींचे बजट, 2013 च्या अर्थसंकल्पापेक्षा 9 पटींनी जास्त
Share Market : अर्थसंकल्पाचा विमा कंपन्यांना फटका, शेअर्समध्ये झाली 14 टक्क्यांपर्यंतची घसरण
Budget 2023 : आता PF मधून पैसे काढल्यावर द्यावा लागणार कमी TDS, जाणून घ्या कोणाला होणार फायदा
Post Office च्या ‘या’ योजनेमधील डिपॉझिटच्या लिमिटमध्ये झाली वाढ !!!
New Tax Slab vs Old Tax Slab : जुन्या अन् नवीन स्लॅबमध्ये काय फरक आहे??? किती उत्पन्नावर किती टॅक्स द्यावा लागेल ते पहा