Budget 5G Smartphones : 5G फोनवर स्विच करताय !!! जरा थांबा… 30,000 रुपयांच्या रेंजमधील ‘हे’ उत्कृष्ट स्मार्टफोन्स पहा

Budget Smartphones
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Budget 5G Smartphones : देशभरात आता अनेक ठिकाणी 5G नेटवर्क सुरु केले गेले आहे. याद्वारे ग्राहकांना आणखी वेगाने इंटरनेटची सुविधा मिळेल. मात्र, यासाठी आपला फोन 5G एनेबल्ड असावा लागेल. जर आपल्यालाही 5G नेटवर्कवर स्विच व्हायचे असेल आणि कमी बजटमध्ये चांगले फीचर्स असलेला फोन हवा असेल तर खाली दिलेल्या काही फोनबाबतची माहिती जाणून घ्या…

Motorola Edge 30 Ultra - motorola IN| Smartphones, Accessories & Smart Home Devices

Motorola Edge 30 हा या लिस्टमधील एक फोन आहे. यामध्ये Qualcomm Snapdragon 778G प्रोसेसर सहीत 6.55 इंच स्क्रीन फुल एचडी डिस्प्ले देखील मिळेल. यासोबतच 50 MP चे 2 रिअर कॅमेरे देखील आहेत. यासोबतच 32 MP चा फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आलेला आहे. तसेच स्टोरेजच्या आधारावर या फोनच्या 2 किंमती आहेत. यातील पहिला 27,999 रुपये तर दुसरा 29,999 रुपये आहे. Budget 5G Smartphones

Realme GT Neo 3T may launch in India next month as rebranded Q5 Pro

या लिस्टमधील पुढचा फोन Realme GT Neo 3T हा आहे. यामध्ये 64 MP मेन रियर कॅमेरा तसेच 8 MP आणि 2 MP चे आणखी 2 कॅमेरे देखील देण्यात आले आहेत. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसरने सुसज्ज असलेल्या या फोनची बॅटरी 5000mAh ची आहे. तसेच 6.43-इंचाची स्क्रीन असलेल्या या फोनची किंमत 29,999 रुपये आहे. Budget 5G Smartphones

Samsung Galaxy A33 5G, Galaxy A53 5G India support pages go live; Galaxy A73 5G spotted on BIS | 91mobiles.com

या लिस्टमधील पुढील फोन Samsung Galaxy A33 5G हा आहे. Exynos 1280 प्रोसेसरवर काम करणाऱ्या या फोनमध्ये 6.4-इंच स्क्रीन असलेला AMOLED प्लस डिस्प्ले आहे. यासोबतच 4 कॅमेरे देखील दिले गेले आहेत. यामधील पहिला कॅमेरा हा 48 मेगापिक्सेल मेन रिअर कॅमेरा आहे. यानंतर अल्ट्राव्हायोलेट, डेप्थ आणि मॅक्रो असे कॅमेरे देण्यात आले आहेत. हा फोन 2 मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे. यामधील एकाची किंमत 28,499 तर दुसऱ्याची किंमत 29,999 रुपये आहे. हे लक्षात घ्या कि, या दोन्ही फोनच्या स्टोरेज कॅपॅसिटीमध्ये फरक आहे. Budget 5G Smartphones

OnePlus Nord 2 5G review: Almost a flagship killer - Root Nation

OnePlus Nord 2T 5G हा या लिस्टमधील पुढचा फोन आहे. यामध्ये MediaTek Dimensity 1300 5G प्रोसेसर सहीत फुल एचडी रिझोल्युशनवाला AMOLED डिस्प्ले मिळेल. ज्याची स्क्रीन 6.43 इंच आहे. यामध्ये 50 MP च्या मेन रिअर कॅमेरा व्यतिरिक्त आणखी 2 कॅमेरे देखील दिले गेले आहेत. यामध्ये समोरील बाजूस 32 MP चा कॅमेरा आहे. 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत 28,999 रुपये आहे. Budget 5G Smartphones

Nothing Phone 1 | TechRadar

या लिस्टमधील शेवटचा फोन असलेल्या Nothing’s phone 1 मध्ये 50 MP चे 2 रिअर कॅमेरे आणि 16 MP चा फ्रंट कॅमेरा मिळेल. तसेच यामध्ये Qualcomm Snapdragon 778G+ प्रोसेसरही देण्यात आलेला आहे. यासोबतच यामध्ये 6.55 इंच स्क्रीन आणि फुल एचडी प्लस डिस्प्ले देखील मिळेल. 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत 27,499 रुपये आणि 256 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 29,499 रुपये आहे.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://in.nothing.tech/pages/phone-1

हे पण वाचा :
‘या’ सरकारी बँकेकडून Home Loan वरील व्याजदरात मिळत आहे सूट
Gold Price Today : दिवाळीनंतरही सोन्या-चांदीच्या दरातील घसरण सुरूच, नवीन दर पहा
Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा
Credit Card चा अशा प्रकारे वापर करून मिळवा अनेक फायदे !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर तपासा