दुधाच्या किंमतीत 5 रुपयांची वाढ; सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार

milk
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून दुधाच्या दरात सातत्याने (Milk Price Hike) वाढ झाल्याचे आपण पाहिले आहे. अनेक दूध उत्पादक कंपन्यांनी दुधाच्या किमतीत वाढ केल्याने सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. त्यातच आता मुंबई दूध उत्पादक संघाने (MMPA) शहरातील म्हशीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर 5 रुपयांची वाढ केली आहे. 1 मार्चपासून ही दरवाढ लागू करण्यात येणार आहे.

एमएमपीएचे अध्यक्ष सी.के.सिंग यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, मुंबईतील 3,000 किरकोळ दूध विक्रेत्याला म्हशीचे दूध 80 रुपयांऐवजी 85 रुपये प्रति लिटरने मिळणार आहे. म्हणजे किरकोळ बाजारात दुधाची किंमत 90 ते 95 रुपयांपर्यंत असू शकते. दुधाचे हे दर 1 मार्च ते 31 ऑगस्टपर्यंत लागू राहणार आहेत. म्हशींचा चारा, पेंड, भुसा, धान्य आदींच्या दरात 15 ते 20 टक्के वाढ झाल्याने ही दरवाढ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितलं.

दरम्यान, मुंबईत दररोज 50 लाख लिटरहून अधिक म्हशीच्या दुधाचा वापर होतो. यापूर्वी सप्टेंबर 2022 मध्ये दुधाचे दर 75 रुपयांवरून 80 रुपये प्रतिलिटर करण्यात आले होते. विशेष म्हणजे या वर्षी फेब्रुवारीमध्ये, महाराष्ट्रातील इतर आघाडीच्या ब्रँडेड उत्पादकांनी गायीच्या दुधाच्या किमतीत सुद्धा किमान 2 रुपयांनी वाढ केली होती. त्यातच आता म्हशीच्या दुधाच्या दरात 5 रुपयांची वाढ करण्यात आल्याने मुंबईकराना त्याचा फटका बसणार आहे.